१५ जून रोजी शेवगाव तालुका कोरोना मुक्ति झाली होती. मात्र तालुक्यातील ही कोरोना मुक्ति औटघटकेची ठरली असून शेवगाव तालुक्यातील भाविनिमगावला कोरोना बाधीत रूग्ण सापडला आहे. मुंबई येथे चालक म्हणून काम करत असताना सुट्टी घेऊन हा व्यक्ति १४ रोजी गावी परतला होता. शाळेतील विलिनीकरण कक्षात आल्यावर लगेच दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे यांनी या रूग्णास तपासले असता कोरोना लक्षणे दिसून आले असता ताबडतोब या व्यतिस नगरला हलवण्यात आले होते. त्याचा आज १६ रोजी रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या पार्श्वभूमीवर भाविनिमगाव दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आपत्ती निवारण समिती ने घेतला असून रात्री उशिरा पर्यंत तहसील परवानगी मात्र समिती ला मिळाली नव्हती.
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड, अशोक वाघ, शेवगाव.