अहमदनगर शेवगाव:
प्रशासकीय कोरोना कर्मचारी यांना कोरोना संरक्षण किटचे वाटप.

अहमदनगर - शेवगाव प्रतिबंधक उपाय हे उपचारा पेक्षा प्रभावी असतात त्यामुळे कोरोना आजारापासून बचावासाठी संरक्षित अंतर, मास्क, स्वच्छ हात याची सवय लावून काळजी घ्यावी असे आवाहन पंचायत समिती सभापती डॉ.क्षितीज घुले यांनी केले.शेवगाव पंचायत समितीच्या लोकनेते मारुतरावजी घुले पाटील सभागृहात कोरोना योध्यासाठी संरक्षण किट वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्राथमिक आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, महसूल प्रशासन, पोलीस, सर्व विभागांनी समन्वय साधून उत्कृष्ट कामगिरी बजावली असून शेवगाव तालुका कोरोनामुक्त केला आहे. 

यावेळी कोरोना योध्यांना पी.पी.ई.किट,फेस सिल्ड किट,पल्स ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे, गट विकास अधिकारी महेश डोके, पंचायत समिती सदस्य शिवाजीराव नेमाने , एरंडगाव पंचायत समिती सदस्य मंगेश थोरात, भाऊसाहेब क्षीरसागर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सलमा हिराणी, वैद्यकीय अधिकारी डॉ.अतुल शिरसाठ, संतोष पावसे, कैलास जाधव,वहाब शेख,समीर शेख व आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.सुत्रसंचलन आरोग्य विस्तार अधिकारी सुरेश पाटेकर यांनी करुन आभार व्यक्त केले.

माय सह्याद्री टीम शंकर मरकड /अशोक वाघ, शेवगाव.
थोडे नवीन जरा जुने