अहमदनगर - शेवगाव
शेवगाव तालुक्यातील कापूस,ज्वारी उत्पादक शेतकरी आणि डाळींब फळबाग शेतकर्यांना विमा रक्कम देण्यास शासकीय यंत्रणेकडून टाळाटळ केली जात हि शासनाची उदासीनता असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना तातडीने विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात जमा करावी अशी मागणी दहिगावने गटातील भाजपा युवा नेते उदय शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. तर तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे याची कल्पना देण्यात आली आहे . कोरोना पार्श्वभूमीवर शेतकरी आर्थिक अडचणीत असून खरीप हंगामात शेतकर्यांना बी-बियाणे,खत,पेरणी यासाठी पैशाची आवश्यकता असून कापूस ,ज्वारी तर तालुक्यातील बोधेगाव महसूल मंडळ वगळता डाळींब फळबागांचा विमा शेतकर्यांना मिळालेला नाही . त्याचप्रमाणे ठिबक सिंचनाच्या अनुदानाचा प्रश्नही मार्गी लागलेला नसून शासनाने शेतकर्यांना कोरोना संकटात मदत करावी असे ही सविस्तर बोलताना सांगितले.
स्वाभिमानी, शिवसेना ,भाजपाचे संयुक्त निवेदन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे,सुनिल रासने,अॅड अविनाश मगरे,बाळासाहेब फटांगडे,भाऊ बैरागी, गणेश औटी, प्रशांत भराट,काकासाहेब जाधव आदी स्वाभिमानी, शिवसेना भाजपा पदधिकारी यांनी संयुक्त पणे निवेदन दिले यात पिक विमा व ठिबक अनुदान देण्याबाबत तहसीलदार यांना विनंती करण्यात आली आहे. हा सार्वजनिक प्रश्न मार्गी नाही लागला तर प्रसंगी आंदोलनाचा मार्ग स्विकारून शेतकऱ्यांना न्याय देण्यास मागे राहणार नसल्याचे उदय शिंदे यांनी सांगितले.
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड / अशोक वाघ, शेवगाव.