अहमदनगर शेवगाव  : 
सरपंच मरकड यांच्या प्रयत्नांना यश. जिल्हा परिषद शेष अंतर्गत गाव विकास योजना रस्ता मजबुतीकरण होणार. 

शेवगाव तालुक्यातील बहुचर्चित भाविनिमगाव - सुकळी रस्ता मजबुतीकरण प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून या रस्त्यावर अवलंबून असलेल्या नागरीकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनास अखेर यश मिळाले असून या रस्त्याचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गाव विकास योजनेअंतर्गत लवकरच मजबुतीकरण (डांबरी ) होणार असल्याची माहिती सरपंच पांडुरंग मरकड यांनी दिली. बहुचर्चित भाविनिमगाव सुकळी रस्ता मजबुतीकरणासाठी   जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.राजश्रीताई घुले, सभापती डॉ. क्षितिज घुले व ग्रामपंचायत स्तरावर सर्वच सदस्यांनी या रस्त्याबद्दल हिरवा कंदील दिल्याने प्रयत्नाअंती हा रस्ता मंजूर असल्याचे मरकड यांनी सांगितले. 
हा रस्ता झाडाच्या अतिक्रमणामुळे व शेतकऱ्यांच्या हद्द निश्चितीवरून वादग्रस्त ठरला होता.  या रस्त्यासाठी शेवटी अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते.  या आंदोलनात पुरुषा बरोबर महिला, मुले हि रस्त्यावर  तब्बल चार तास ठाण मांडुन होते. याचा एकत्रित परिणाम म्हणून शेवगाव नायब तहसीलदार मयुर बेरड यांनी स्वतहा एक तास उपस्थित राहून रस्त्यावरील अतिक्रमण काढले होते. व नंतर शासनाने पानंद रस्त्या अंतर्गत ५० हजाराचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिला व या भागातील शेतकऱ्यांनी लोकवर्गणी ची जोड देत हा रस्ता भराव करून मजबूत केला होता. व पुढे ग्रामपंचायत स्तरावरून प्रयत्न करत सरपंच मरकड यांनी या १ किमी अंतर असलेल्या रस्त्याला डांबरीकरण मंजूरी मिळवून दिली आहे. 

माय सह्याद्री टीम
शंकर मरकड /अशोक वाघ, शेवगाव
संपर्क - mysahyadrilive@gmail.com 
थोडे नवीन जरा जुने