अहमदनगर :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगर-पुणे रोड येथील पक्ष कार्यालयात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनाच्या संकटकाळात जिल्ह्यासह महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवड भरुन काढण्यासाठी या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. कोरोनाची भिती बाजूला सारुन राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता सर्वसामान्यांना आधार देण्याचा प्रयत्न करीत आहे. राष्ट्रवादीने सर्वसामान्य व्यती केंद्रबिंदू मानून समाजकारण केले. कोरोना व कोकण येथील वादळ अशा संकटकाळात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार वयाच्या ८० व्या वर्षी सर्वसामान्यांना आधार देत आहे. जिल्ह्यात देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या संकटकाळात गरजूंना विविध प्रकारे मदत केली.
लाखो नागरिकांपर्यंत मदत पोहचल्याने त्यांच्यामध्ये एक प्रकारची समाधानाची भावना निर्माण झाली व ते कुटुंब राष्ट्रवादीशी जोडले असल्याचे त्यांनी सांगितले. तर कोरोना संकटकाळात जीवाची बाजी लावून कर्तव्य बजाविणार्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक व पोलीसांचे यावेळी विशेष आभार मानले. सकाळी १० वाजता प्रारंभी पक्षाचा झेंडा माजी आमदार डॉ नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते फडकाविण्यात आला. रक्तदान शिबीराचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने प्रारंभ करण्यात आले. या शिबीरास युवा कार्यकर्त्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. कोरोना संकटकाळात विशेष योगदान महिला डॉक्टर, परिचारिका, पोलीस, शासकीय अधिकारी यांना मर्दानी महाराष्ट्राची या सन्मानाने पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदिप वर्पे, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, आमदार संग्राम जगताप, जि.प. सदस्या सौ. प्रभावती ढाकणे, निरीक्षक वर्षाताई शिवले, डाॅ. नरेंद्र घुले पाटील, प्रताप ढाकणे, मंजुषा गुंड, निर्मला मालपाणी, शारदा लगड, अंबादास गारुडकर, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक संजय चोपडा, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, अमोल गाडे, किसनराव लोटके, सोमनाथ धूत, उबेद शेख, सिताराम काकडे, कपिल पवार, संजय कोळगे, सुरेश बनसोडे, अभिजीत खोसे, बाबासाहेब गाडळकर, महेश बुचडे, अमित खामकर, वैभव ढाकणे, साहेबान जहागीरदार, जॉय लोखंडे, रेशमा आठरे, साधना बोरुडे, अंजली आव्हाड, योगेश नेमाणे, राजेश भालेराव, ज्ञानेश्वर कापडे, अथर खान, भरत गारुडकर, संजय सपकाळ, अभिजीत सपकाळ, गजेंद्र भांडवलकर, सारंग पंधाडे, सय्यद साबीर अली, रत्नाकर ठाणगे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड /अशोक वाघ ,शेवगाव.