जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे यांनी केला प्रमोद लांडे यांचा सन्मान. 

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग उपसंचालक (क्लास वन अधिकारी) पदी नियुक्ती झालेल्या प्रमोद लांडे यांच्या यशाने ग्रामीण भागातील मुले देखील कष्ट , चिकाटी, व जिद्दीच्या बळावर यश संपादन करत आहेत . यात शंका नसून आज प्रमोद लांडे यांच्या कष्टाचे पाढे मुलांनी वाचले पाहिजे. ग्रामीण भागातील मुलांनी प्रामाणिक प्रयत्न केले तर यश नक्कीच तुमचा दरवाजा ठोठावल्या शिवाय राहणार नाही असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे यांनी केले.

शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव येथील प्रमोद लांडे यांची नुकतीच लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग उपसंचालक (क्लास वन अधिकारी) पदी नियुक्ती झाल्याबद्दल जनशक्ती विकास आघाडी शेवगाव-पाथर्डीच्या वतीने त्यांचा शेवगाव येथे अॅड. शिवाजीराव काकडे  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आज मोठ्या पदावर विराजमान झाला याचा खूप आनंद होतोय. एका गरीब शेतकरी कुटुंबातील लांडे  संगमनेर येथे नगरपालिकेत पुरवठा निरीक्षक अधिकारी पदावर  कार्यरत असताना आपल्या
परिस्थितीची जाण ठेवून आपल्या जिद्दीच्या, मेहनतीच्या व चिकाटीच्या बळावर आज या पदावर पोहचला आहे. आजच्या तरुण पिढीने सोशल मीडियाच्या मागे न जाता लांडे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले ध्येय गाठले पाहिजे. असे कातडे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले . 

यावेळी जि.प. सदस्या सौ.हर्षदाताई काकडे, माजी प्राचार्य विक्रम लांडे, प्रा. लक्ष्मण बिटाळ, शरदकुमार फसले, बाळासाहेब पाटेकर, ज्ञानेश्वर फसले, योगेश देशमुख, अविनाश पाटेकर, संभाजी लांडे, हरीश खरड, बाळासाहेब खवले, गणेश जायभाये, अनिल जिवडे, शिवाजी पाटेकर, प्रदीप लांडे, प्रवीण लांडे, राहुल लांडे आदी उपस्थित होते.

माय सह्याद्री टीम शंकर मरकड / अशोक वाघ, शेवगाव.
थोडे नवीन जरा जुने