अहमदनगर - पाथर्डी
निवेदनाद्वारे केली शेतकरी हिताची मागणी.
निसर्गाच्या मदतीने विज निर्मिती करणा-या पवनचक्की पावसाळ्यात मात्र याच नैसर्गिक पावसाळी ढगांना परीसरात थांबू न देता दुरवर वेगात लोटतात त्यामुळे परिसरात पाऊस मान कमी राहत असल्याने किमान पावसाळ्यात तीन महिने या पवनचक्क्या बंद ़ठेवण्यात याव्यात अशी मागणी पाथर्डी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत मरकड यांनी तहसीलदार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की पाथर्डी तालूका हा नेहमीच दुष्काळी परिस्थितीशी सामना करत आलेला असून तालूक्याच्या डोंगर माथ्यावर उभारण्यात आलेल्या पवनचक्यामुळे गेली सहा सात वर्षापासून तालूक्यातीला निवडूंगे ,मढी ,धामणगाव ,करंजी ,तिसगाव ,कौडगाव ,भोसे, देवराई या भागाला सतत पाऊस हूलकावणी देत आला आहे.तरी डोंगरावर उभारलेल्या पवनचक्या किमान पावसाळ्यातील 3/4 महीने बंद ठेवाव्यात असे सुचविले आहे.
मागणीचे निवेदन नायब तहसिलदार पंकज नेवसे यांनी स्विकारले.
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड, अशोक वाघ ,शेवगाव.