सोलापूर :
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहूलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुक्रवार, दि. 19 जून 2020 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावतीने गोर-गरीब, गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.
संपूर्ण जगभरात कोरोना या विषाणूच्या प्रादूर्भावाने मोठ्या प्रमाणात जिवीतहानी होत आहे. त्यामुळे आपल्या सरकारनेे या कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दि. 24 मार्च 2020 पासून लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली होते.
यामुळे सोलापूर शहरातील रिक्षा चालक, इतर व्यवसाय, विविध कारखाने आदि. बंद असल्यामुळे अनेकांचे रोजगार संकटात आले. त्यांना कोणताही रोजगार नसल्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांच्यावतीने काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहूलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त रिक्षा चालक संघटना, अपंग संघटना व गोर-गरीब, होतकरु लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस अध्यक्ष बाबा करगुळे, NSUI अध्यक्ष गणेश डोंगरे, परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, कुमारगौरव चंदनशिवे आदि. उपस्थित होते.
माय सह्याद्री टीम - अहमदनगर