अहमदनगर, कोपरगाव  :
शहजापूर येथे शहाजापूर, सरेगाव  भागात सामाजिक वनीकरण विभागामार्फत करण्यात येणाऱ्या १००० झाडांच्या वृक्षारोपनाची सुरुवात आज आमदार आशुतोष काळे यांनी वृक्षारोपण करून केली.

शहाजापूर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सामाजिक वनीकरण विभागाकडे १२ किलोमीटर वृक्ष लागवड व्हावी याबाबत पाठपुरावा केला होता. सदर पाठपुराव्याबाबत सामाजिक वनीकरण विभागाने सकारात्मक प्रतिसाद देऊन या परिसराचा आढावा घेऊन शहाजापूर, सुरेगाव, शहा रोड येथे दुतर्फा २ किलोमीटर अंतरावर वृक्ष लागवड करण्यासाठी १००० वृक्ष रोपे उपलब्ध करून दिली आहेत.

याप्रसंगी पंचायत समिती सभापती सौ.पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, गौतम बँकेचे व्हा.चेअरमन राजेंद्र ढोमसे, सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकारी पूजा रक्ताटे, सौ.श्रद्धा मेहेरखांब, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे, शहाजापूरचे सरपंच सचिन वाबळे, उपसरपंच बाळासाहेब ढोमसे, ज्ञानेश्वर हाळनोर, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, उपसरपंच सुनील कोळपे, प्राचार्य नूर शेख, प्राचार्य सुभाष भारती, पोलीस पाटील इंद्रभान ढोमसे, ग्रामसेविका सुप्रिया टोरपे, सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

माय सह्याद्री टीम 
शंकर मरकड  / अशोक वाघ ,शेवगाव.
थोडे नवीन जरा जुने