चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी
महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी आज पठार भागातील आंबी खालसा तसेच इतर गावामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून माहिती जाणून घेतली व प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आमदार डाॅ. किरण लहामटे, सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, आर.एम.कातोरे, पंचायत समिती सदस्या प्रियंका गडगे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरूळे, उपसरपंच सूरेश कान्होरे, गोकुळ कहाणे, सुरेश गाडेकर, अॅड.सुहास आहेर, सुहास वांळुज, बाळासाहेब ढोले, रवि काशिद आदिंसह कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड / अशोक वाघ ,शेवगाव.