अहमदनगर शेवगाव :
कोरोना पार्श्वभूमीवर एका कामगाराची व्यथा मांडली आहे. रेखाचित्रातुन आणि शब्दातुन चित्रकार, कलाशिक्षक गणेश सरोदे यांनी.
गावाकडे दोन एकर शेती ती देखील कोरडवाहू पाऊस पडला तरच शेतीमध्ये निदान खान्यापुरत का होईना अन्नधान्य पिकायचं बंधाऱ्यांच पाणी आटलं विहिरी कोरड्या ठाक झाल्या.. सगळीकडे भीषण दुष्काळाच्या झळा जाणवत होत्या म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी काही वर्षां पूर्वी मुंबईला जाऊन राहिलो.तेथेही राहण्याच्या व कामाच्या खूपच अडचणी.दररोज नाक्यावर जाऊन उभा राहायचं. एखादा ठेकेदार येणार, इमारतीच्या बांधकामासाठी मजूर पाहिजेत असं ऐकल्यावर मनाला आनंद व्हायचा दिवसभर गवंड्याच्या हाताखाली विटा, वाळू यांचं काम करायचं ३०० रुपये हजेरी मिळायची घर भाडे पाचहजार , व प्रापंचिक खर्च असा मिळून तेवढ्या रोजंदारीवर कसं का होईना आनंदात राहत होतो मात्र १५ मार्च या दिवशी मनात धस्स झालं कोरोना या रोगाने पूर्ण देशभरात थैमान घातलेलं असल्याने उद्यापासून लाॅग डाऊन होणार भारत देश पूर्णपणे बंद होणार हे ऐकूनच अंगावर शहारे आले.काम पूर्णपणे बंद झालेली होती . दिवसभर काबाड कष्ट करून मिळालेल्या मजुरीवर घर चालवत होतो .पोटाला पोटभर खात होतो .
दोन छोटी मुले त्यांचाही सांभाळ करत होतो.काम करून जमा केलेले पैसे दहा-पंधरा दिवस पुरले. वाटल लॉक डाऊन दहा पंधरा दिवसात संपेल हाताला काम मिळेल याच वेड्या अपेक्षेने वाट पाहत राहिलो .दोन महिने उलटून गेली नंतर मात्र खर्चाचा काहीच ताळमेळ बसेना म्हणून पत्नी व छोटे मुले घेऊन अनवाणी पायाने गावाच्या दिशेने निघालो.सलग पाच ते सात दिवस पायी चालत होतो. पाय रक्ताळलेले होते काट्याकुट्यांनी अन वाटत होता लांबच लांब रस्ता सरणावर मरण असल्यासारखीच होती दशा पण प्रपंचासाठी खाल्ल्या उन्हातानात खस्ता रस्त्याने मिळेल त्या ठिकाणी पाणी मिळेल ते अन्न खाऊन कसं बसं गाव गाठलं.गावात आल्यानंतर पुन्हा तीच भयान दुष्काळाची परिस्थिती गावाकडील घर पडलेलं होतं.लाकडी बांबू व उसाचे पाचरट यांच्या सहाय्याने एक छोटसं राहण्या पुरतं छप्पर बांधलं .दिवसभर मिळेल ते काम करायचं येणाऱ्या मजुरीतून कुटुंब चालवत होतो .मनामध्ये कुठेतरी चैतन्याचं वातावरण निर्माण होत होतं .
परंतु नियतीच्या मनात वेगळच काहीतरी होतं तीन जून हा दिवस पुन्हा आमच्यासाठी काळरात्र ठरली दिवसभर काबाडकष्ट करून रात्रीचे पोटभर जेवण करून अंथरुणावर कुठेतरी नेटकच अंग टाकलेलं असताना खूपच भयानक असं निसर्ग चक्रीवादळ आले. आणि बांधलेलं छप्पर त्या वादळाने उडून गेलं.पाऊस येत होता . विजा कडकडत होत्या. ढगांचा गडगडाट चाललेला होता.लाईट गेलेली असल्याने सगळीकडे अंधारच अंधार दिसत होता काय करावे काहीच सुचत नव्हते. दोन्ही मुलं व पत्नी यांना घेऊन कुठेतरी निवारा मिळेल या वेड्या आसेन सैरभैर पळत होतो वस्तीवर असलेल्या एका घराच्या समोरील पढवीमध्ये आम्ही सर्वजण थांबलो.ताशी १२० वेगाने वारे वाहत होते . विजांचा कडकडाट ढग मोठ्याने गरजत होते.
सगळीकडे अंधारच अंधार काय करावं काहीच सुचत नव्हतं आम्हाला वाचव एवढीच मागणी देवाकडे करत होतो. त्याच ठिकाणी थांबून पूर्ण रात्र जागून काढली.व सकाळी परत आपल्या छपराच्या दिशेने निघालो आल्यावर पाहतो तर काय छप्पर पूर्णपणे उडालेलं घरातील रोजच्या वापरायच्या वस्तू , कपडे. त्या चक्रीवादळाने इकडे तिकडे पडलेल्या दिसल्या. ती सगळी परिस्थिती पाहून भोवळ आल्यासारखे वाटले व पटकन जमिनीवरती बसलो डोक्याला हात लावला. देवाला एकच प्रश्न विचारला आता वाटतं बस्स झालं .देवा आता सोसवत नाही रे आमच्याच वाट्याला हे दुःख का. आता तूच सांग आम्ही जगायचं कसं. आंम्हालाही पूर्वीसारखं हसत-खेळत जगायचं रे. या सगळ्या संकटातून तू आम्हाला नक्कीच वाचवशील . व पुन्हा हसत खेळत आयुष्य जगण्याची तू आम्हाला संधी देशील हीच तुझ्याकडे प्रार्थना व अपेक्षा करतो.
शब्दांकन
श्री. गणेश सरोदे , कलाशिक्षक
एम. एम. नि-हाळी विद्यालय पाथर्डी.
मो. नं. 99 22 32 38 13.
शहरटाकळी गावचे रहिवासी असलेल्या सरोदे यांनी
विविध रंग माध्यमांमध्ये निसर्गचित्र , व्यक्तिचित्रण रेखाटन केले आहे.श्री सरोदे यांना जिल्हा स्तरीय, विभागीय व राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे.
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड / अशोक वाघ , शेवगाव.