नाशिक : 
स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष संदिप जगताप यांनी घेतली द्राक्ष उत्पादक प्रश्नी भेट

या वर्षी नाशिक जिल्ह्यातील निर्यात झालेल्या द्राक्ष उत्पादकांना त्यांच्या ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे पैसे देण्यास अनेक निर्यात कंपन्यांनी कोरोनाचे कारण देऊन  टाळाटाळ केली आहे.भाव कमी करण्याचा शेतकऱ्यांवर दबाव वाढवत आहे. मात्र आज शेतकरी अडचणीत असताना सर्व लोकप्रतिनिधींनी या संदर्भात गांभीर्याने लक्ष घालावे अशी विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी खासदार भारतीताई पवार यांची  नाशिक येथील निवासस्थानी भेट घेऊन केली.

द्राक्ष उत्पादक तालुक्यातील सर्व आमदारांना देखील संदीप जगताप यांनी पत्र लिहले आहे.भारतीताई पवार व संदीप जगताप यांच्या बैठकीत एक्स्पोर्ट द्राक्ष अडचणीबरोबर लोकल व्यापाऱ्यांवर देखील कसे नियंत्रण आणायचे व दरवर्षी होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवायची या बाबत सविस्तर चर्चा झाली. वकरच मी स्वतः  या प्रकरणात पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळण्यासाठी प्रयत्न करीन.असे आश्वासन यावेळी भारतीताई पवार यांनी संदीप जगताप यांना दिले.यावेळेस जानोरी येथील योगेश तिडके उपस्थितीत होते.

माय सह्याद्री टीम  
शंकर मरकड अशोक वाघ, शेवगाव.
थोडे नवीन जरा जुने