स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदिप जगताप यांची मागणी. 

मुंबई : 
 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांना अधिकृत प्रस्ताव दिला आहे. राजू शेट्टी यांनीच हे सदस्यत्व स्वीकारावं असा शरद पवार यांचा निरोप घेऊन स्वतः जयंत पाटील हे राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी गेले होते. या प्रस्तावा बाबत स्वाभिमानीचे कार्यकर्ते  व राज्यव्यहार समिती या बाबत निर्णय घेईल.अस म्हणून राजू शेट्टी यांनी आघाडीला कोणताही निर्णय दिला नाही.पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राजू शेट्टींसारखा अभ्यासू ,आक्रमक आणि प्रामाणिक माणूस विधांनपरिषदेवर हवा अशी राज्यभरातील शेतकऱ्यांची व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे. म्हणून कार्यकर्ता व शेतकऱ्यांच्या इच्छेखातर राजू शेट्टी यांनी विधानपरिषदेत प्रतिनिधित्व  करावे अशी गळ घातल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.

राजू शेट्टी यांनी देशभरातील अनेक शेतकरी संघटना एकत्र करून देशपातळीवर शेतकऱ्यांची भक्कम मोट बांधली आहे. शेतकऱ्यांच्या विकासाची ध्येय धोरणं संसदेत ठरत असतात.त्या मुळे मला राज्यात नाही केंद्रात रस आहे.असं त्यांनी अनेकदा स्पस्ट केलंय. परंतु सध्य स्थितीत त्यांनी विधानपरिषदेचे सदस्यत्व स्वीकारल्यास त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा मोठा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना व महाविकास आघाडीला होईल.कारण त्यांना एक वेळेस विधानसभा व दोन वेळेस लोकसभेत काम करण्याचा अनुभव व सोबत शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सखोल माहिती आहे.
विधानपरिषदेच सदस्यत्व स्वीकारावे - जगताप.
विधानपरिषदेच्या प्रस्तावाची बातमी माध्यमांतून बाहेर आल्यावर राज्यभरातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मला फोन करून राजू शेट्टी साहेबांनी स्वतःच ही जागा स्वीकारावी असा आग्रह धरला.कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या माझ्याकडे आलेल्या भावना मी राजू शेट्टी साहेब यांना दूरध्वनीवरून कळवल्या आहे.तसेच या सगळ्या भावना लक्षात घेता.तुम्ही स्वतः च हे सदस्यत्व स्वीकारावे अशी गळ मी ही शेट्टी साहेबांना घातली आहे.
संदीप जगताप प्रदेशाध्यक्ष - स्वाभिमानी शेतकरी संघटना
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधानपरिषदेवर जावे -अमोल हिप्परगे
मागील 25 वर्षे अविरतपणे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चळवळीच्या माध्यमातून आवाज उठवणारे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारं व्यक्तीमत्व म्हणून राजू शेट्टी यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांना विधानपरिषदेवर घेऊन महाविकास आघाडीचे सरकार अधिक चांगल्या पद्धतीने शेती आणि त्यासंबंधीची धोरणे राबवू शकेल. म्हणून स्वतः राजू शेट्टी यांनी विधानपरिषदेवर जावे अशी मागणी महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्ते आणि पदाधिकारी करत आहेत...
अमोल हिप्परगे 
प्रदेशाध्यक्ष -स्वाभिमानी विद्यार्थी परिषद

माय सह्याद्री टीम 
शंकर मरकड /अशोक वाघ, शेवगाव.
थोडे नवीन जरा जुने