आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी. फार्मसी बोधेगावात कॉलेज वतीने कॉ आबासाहेब यांना अभिवादन.

अहमदनगर शेवगाव  : 

आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी. फार्मसी बोधेगावात कॉलेज वतीने कॉ आबासाहेब यांना अभिवादन.

अहमदनगर - शेवगाव कॉ. आबासाहेब काकडे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या शैक्षणिक संस्थांचा आज वटवृक्ष झालेला आहे.कॉ. आबासाहेब यांचा जीवनपट , त्यांची गरजू आणि मागासलेल्या व्यक्तीविषयी असलेली तळमळ यामधून त्यांनी जे जनसेवेचे व्रत हाती घेतले त्यातून त्यांची सामान्य जनतेविषयीची आत्मीयता दिसून येते.कॉ. आबासाहेब पेशाने जरी वकील असले तरी त्यांनी वकिली हे अर्थजनाचे साधन म्हणून कधीही बघितले नाही.त्यांनी कायम तळागाळातील लोकांना बरोबर घेऊन सत्तेच्या विरोधात लढा दिला असे प्रतिपादन महाविद्यालयाचे उपप्राचार्य भरत जाधव यांनी केले. 
आंबासाहेब काकडे वृक्षारोपण शेवगाव

महाविद्यालयात कॉ. आबासाहेब काकडे जयंती निमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त महाविद्यालयामध्ये "एक कर्मचारी-एक वृक्ष" हा उपक्रम राबवून सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी वृक्षांचे पालकत्व स्विकारले. संस्थेचे सेक्रेटरी अॅड विद्याधरजी काकडे ,संस्थेच्या अध्यक्षा तसेच जि. प. सदस्या सौ. हर्षदाताई काकडे महाविद्यालयाचे समन्वयक प्रा दसपुते , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पट्टण शशिकांत यांनी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे "एक कर्मचारी-एक वृक्ष" ही संकल्पना हाती घेतल्याबद्दल कौतुक केले. 

My Sahyadri 
माय सह्याद्री टीम शंकर मरकड /अशोक वाघ ,शेवगाव
थोडे नवीन जरा जुने