अहमदनगर :
आपले रक्षण, आपणच करावे मात्र आपणच करतोय खराब आणि घालतोय आयुष्य धोक्यात. वाचा कवितारूपी .
बदल अजून तुझी
वखवखलेली दृष्टी
वाचव मित्रा घायाळ
सारी उदार सृष्टी
उद्योगधंदे वाढवूनी
सोडला बेफाम धूर
हवामानाच्या नावाने
आळवू नकोस सूर
सागराच्या तोंडात
सोडले रसायनी पाणी
विसरून जा आता
झिम्मड पाऊस गाणी
नदीपात्रे बुजवूनी
उभारल्या इमारती
कुठे चालली तुझी
स्वार्थी धुंद मती
उत्खनन करूनी उदास
केला भूगर्भाचा साठा
उजाड झाल्या समृद्धीच्या
साऱ्या पाऊल वाटा
केले विद्रुप डोंगर
तुझ्या हव्यासापायी
जगेल कसा निसर्ग
तुझी जन्मदात्री आई
जंगल तोडूनी अमाप
गुदमरला आता श्वास
तुझ्याच हाताने तूच
घेतालास गळफास
किलबील पाखरांची
केलीस तूच बंद
घेशील कसा तूच
फळा फुलांचा गंध
छंदापायी प्राण्यांची
केलीस तूच शिकार
क्रूर तुझ्या वागण्याचा
करतो निसर्ग धिक्कार
भूकंप वादळ प्रलय
रोगराई त्याचे लक्षण
वाचव राजा निसर्ग
कर आपुले रक्षण
कवी
गवाजी बळीद mob. 7775984451
जि.प प्रा शाळा प्रभू वाडगाव
ता शेवगाव जि अहमदनगर
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड / अशोक वाघ, शेवगाव.
संपर्क - mysahyadrilive@gmail.com