अहमदनगर - शेवगाव 
भारत सरकारच्या गृह मंत्रालय कडून देण्यात येणारा आंतरिक सुरक्षा सेवा पदक शेवगाव उपविभागीय पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांना जाहीर झाले आहे. महाराष्ट्रातील  गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील उत्कृष्ट सेवेबद्दल हे पदक देण्यात आले.

मंदार जवळे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे उपविभागीय पोलीस अधीकारी म्हणून कार्यरत आहेत. जवळे यांनी 2015 ते 2018 या काळात गोंदिया जिल्ह्यात सेवेत असताना नक्षलवादी परिसरात जबाबदारीने कर्तव्य बजावल्याने त्यांना केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या वतीने आंतरिक सुरक्षा सेवा पदक देण्यात आले आहे. या कामगिरी बद्दल विविध क्षेत्रातुन जवळे यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे. 

माय सह्याद्री टीम
शंकर मरकड / अशोक वाघ, शेवगाव.
थोडे नवीन जरा जुने