डॉ. नरेंद्र घुले वाढदिवस निमित्ताने कोरोना जनजागृती

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा ,महाविद्यालय बंद आहेत. विद्यार्थी हित लक्षात घेता लवकरच शासकीय पातळीवर शालेय निर्णय होईल परंतु आज कोरोना कहर वाढत असून जनजीवन ठप्प राहणार नाही. एक जवाबदार नागरिक या नात्याने सोशल डिस्टन्सिंगच पालन करुन शिंकताना व खोखताना तोंडावर रुमाल चा वाफर करावा व बाहेर पडताना मास्क किंवा रुमाल लावणे गरजेचे आहे. असे इतर अनेक संकटात आपन कोरोना बरोबर जगायला आता शिकले पाहिजे असे प्रतिपादन दहिगावने लोकनेते मारूतरावजी घुले पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि. एन. वाबळे. यांनी केले. संस्था अध्यक्ष माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले यांच्या वाढदिवसानिमित्त दहिगावने येथील नवजीवन विद्यालय व घुले महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळत विद्यार्थी व पालकांना मास्क व सिनेटायझर चे वितरण करण्यात आले. 

कार्यक्रमास उपस्थित सरपंच सुभाष पवार, उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुध्दे, प्राचार्य कारभारी नजन, विष्णू मरकड, माध्यमीक शिक्षक सोसायटी अध्यक्ष काकासाहेब घुले, सदस्य भरत घोडके, मकरंद बारगुजे, मच्छीद्र पानकर, पालक कारभारी वाघ, लक्ष्मण काशिद , डॉ. .कैलास कानडे, प्रशासकीय अधिकारी के.वाय.नजन, सुरेश घनमोडे, प्रा.अप्पासाहेब खंडागळे, प्रा.निलेश खरात, विकास थोरात, अक्षय काळे, जालिंदर चितळे ,सोमनाथ निळ, तात्यासाहेब माताडे, सिताराम मोरे,कृष्णा थोरात आदिसह विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिकंदर शेख यांनी केले, तर आभार मकरंद बारगुजे यांनी व्यक्त केले.

माय सह्याद्री टिम- शेवगाव अहमदनगर 
थोडे नवीन जरा जुने