अहमदनगर - कोपरगाव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री, पद्मविभूषण, आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरच्या प्रतिमेला आज कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच गोपीचंद पडळकरवर शासनाने कठोर कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्री मा.  उद्धवजी ठाकरे यांना तहसीलदार योगेश चंद्रे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव आमदार आशुतोष काळे यांनी दिली. 

शरदचंद्रजी पवार हे संपूर्ण देशातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. देशाच्या आणि राज्याच्या विकासात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. आदरणीय पवार साहेब हे आजच्या तरुण पिढीचे आदर्श आहेत. गोपीचंद पडळकर यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केलेले बेताल वक्तव्य अतिशय मूर्खपणाचे असून त्यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी आमदार काळे यांनी यावेळी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील गंगूले, युवकअध्यक्ष नवाज कुरेशी, महिला अध्यक्ष सौ. प्रतिभाताई शिलेदार, युवती अध्यक्ष सौ. माधवीताई वाकचौरे, गटनेते वीरेन बोरावके,  नगरसेवक,  सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

माय सह्याद्री टीम शंकर मरकड , अशोक वाघ, शेवगाव.
थोडे नवीन जरा जुने