रेशन कार्ड नसलेल्या कुटुंबालाही मिळणार धान्य
संपूर्ण देशभरात कोरोना चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होत आहे. त्यामुळे सरकारनेे या विषाणूचा प्रसार होऊ नये या कारणास्तव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात संचारबंदी लागू केली होती . मजुरांना दोन वेळच्या जेवणाची सोय नाही. सोलापूर शहरात काही नागरीकांकडे रेशनकार्ड नाही त्यांना कोणताही रोजगार नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकरीता सोलापूरातील ज्या नागरीकांचे रेशनकार्ड नाहीत अशा नागरीकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेशनदुकानातून अन्नधान्य मिळण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी सरकारकडे मागणी केली होती.
ती मागणी मान्य करण्यात आली असून ज्यांच्याकड़े रेशन कार्ड नाही अश्या कुटुंबाला मे व जून महिन्याचे धान्य आपल्या घराजवळील रेशन दुकानातून धान्य मिळणार आहे त्यासाठी संपूर्ण कुटुंबाचे आधारकार्ड, फोटो, लागणार आहे.तरी अशा गरजु नागरीकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
आमच्या फेसबुक पेजला लाईक व फाॅलो करा
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड / असोक वाघ,
संपर्क - mysahyadrilive@gmail.com .