राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व देशाचे जेष्ठनेते शरदचंद्र जी पवार यांच्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेले बेजबाबदार पनाचे विधान खोडसाळ व लोकशाहीस घातक ठरणारे असल्याचे मत माजी जिल्हा परीषद सदस्य शिवशंकर राजळे यांनी व्यक्त केले. पडळकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने पडळकर यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करुन त्याच्या निषेधाच्या घोषण देत प्रतिमा दहन करण्यात आले यावेळी राजळे बोलत होते.
यावेळी नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी माजी जिल्हा परीषद सदस्य शिवशंकर राजळे ,तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे ,राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष चंद्रकांत मरकड, जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे ,नगरसेवक बंडू बोरुडे ,शहराध्यक्ष योगेश रासने , दिगंबर गाडे ,देवा पवार, भाऊ तुपे ,योगेश वाळके ,अक्रम आतार ,अनिकेत निनगुरकर आदींसह पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड /अशोक वाघ, शेवगाव