अहमदनगर शेवगाव :
मेहनतीच्या  बळावर ग्रामीण भागातील मुले मोठ्या पदावर पोहचत आहेत. आठरे यांनी मिळविलेले  अभूतपूर्व यश आपल्या सर्वांसाठी गौरवाचे आणि मानास्पद आहे असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे यांनी  केले. पाथर्डी तालुक्यातील पारेवाडी या ग्रामीण भागातील संतोष आठरे यांची नुकतीच तहसिलदार पदी नियुक्ती झाल्याबद्दल जनशक्ती विकास आघाडी शेवगाव-पाथर्डीच्या वतीने त्यांचा शेवगाव येथे अॅड. शिवाजीराव काकडे  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 

संघर्षातूनच माणसे मोठी होतात. जिथे संघर्ष आहे तिथे यश निश्चित आहे आणि आठरे यांनी मिळविलेले यश हे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि दिपस्तंभ ठरणार आहे. मला खात्री आहे की, त्यांचे यश पाहून बऱ्याच विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत जाऊन यश मिळवण्याचे व आयुष्यात संघर्ष करून मोठे होण्याची प्रेरणा मिळेल त्यासाठी संतोष आठरे यांच्या कष्टाचे पाढे मुलांनी वाचले पाहिजे. त्यांचा आदर्श व जिद्द ठेवली पाहिजे. 

यावेळी जि.प.सदस्या सौ.हर्षदा काकडे, जि.प.सदस्या सौ.संध्याताई आठरे, प्रा.लक्ष्मण बिटाळ, भालसिंग पिंटू, प्रा.पाठक , जनशक्ती विकास आघाडीचे शहरप्रमुख सुनील काकडे, श्रीकांत वाघुंबरे, रविंद्र कुटे, राजेंद्र फलके, माजी सरपंच सुरेश चौधरी आदी प्रमुख उपस्थितीत होते.  

माय सह्याद्री टीम
शंकर मरकड /अशोक वाघ, शेवगाव.
थोडे नवीन जरा जुने