माय सह्याद्री- अहमदनगर.
वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष.
शब्दांकन -
बाळासाहेब आरगडे - भेंडा.
बाळासाहेब बापू मरकड,
दहिगावने सेवा सोसायटी चेअरमन.
संकलन -
पत्रकार शंकर मरकड, भाविनिमगाव.
पत्रकार अशोक वाघ , मठाचीवाडी.
शेवगाव - नेवासा परीसरातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, आरोग्य, पाणी, वीज, दूरध्वनी,रस्ते , उद्योग अशा अनेक क्षेत्रात सक्षम आणि भगीरथ प्रयत्न लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांनी केले आहे. त्याच लोकाभिमुख कार्याचा वसा घेऊन त्यांचे जेष्ठ सुपुत्र माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने स्व. लोकनेते यांचा सुसंस्कृत व सर्वसामान्य माणसाचे जीवन सुसह्य करण्याचा व घराण्याचा वारसा समर्थपणे पुढे चालवला आहे. अभ्यासू विकासाचा ध्यास घेतलेला, उच्चशिक्षित, सुस्वभावी, स्पष्टवक्ता, उत्साही, कामाची धडाडी असणारा, सामान्य माणसाच्या प्रश्नाला भिडणारा, चरित्रसंपन्न लोकप्रतिनिधी शेवगाव नेवासा तालुक्याला लाभल्याने विधानसभेत दहा वर्ष प्रतिनिधित्व करताना त्यांनी आपल्या मतदारसंघात नेत्रदीपक कामे केली .त्यांच्या अंगी असलेल्या शिस्त, चिकाटी, जिद्द , लढाऊवृत्ती, बुद्धिमत्ता या गुणांच्या जोरावर त्यांनी या परिसराचा अभूतपूर्व कायापालट केला आहे.
अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष,अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्यातील विकासकामे गतिमान करून जिल्ह्याला नवी दिशा दिली, ग्रामीण भाग स्वयंपूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यांच्या काळात महाराष्ट्र शासनाने अहमदनगर जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून गौरविले. त्यांच्यातील समर्थ प्रशासक, कुशल संघटक, अभ्यासूवृत्ती या गुणांचा प्रत्यय या काळात आला. या काळात त्यांनी आपल्या कार्यातून जिल्हाभर आपला चाहतावर्ग निर्माण केला. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय,क्षेत्रात त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा अल्पावधीतच उमटवला इंग्रजी,मराठी,हिंदी भाषेवर त्यांचे प्रभुत्व असल्यामुळे व वाचनाची प्रचंड आवड असल्याने अगदी ग्रामीण भागातील प्रश्नापासून आंतरराष्ट्रीय प्रश्नांची त्यांना जाण आहे.
त्यामुळे त्यांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. कोणावरही व्यक्तिगत टीका न करता विकास कामावर भर देणे व पक्षाची ध्येयधोरणे समाजापर्यंत पोचविणे या गोष्टीवर त्यांचा जास्त भर असतो . जिल्हा परिषदेत अध्यक्ष असताना त्यांच्या कामाचा आवाका पाहून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेची उमेदवारी दिली. सलग दुसऱ्यांदा विधानसभेत निवडून गेल्यानंतर त्यांनी सर्वाधिक शासकीय निधी मतदार संघात आणण्याचा महाराष्ट्रात उच्चांक केला. उपजत समाजकार्याची आवड असल्यामुळे त्यांनी परिसराच्या विकासाचा सर्वांगीण अभ्यास केला आणि त्या दिशेने प्रगतीचे पाऊल टाकले. दूरदृष्टी ठेवून विकास साधला. स्पर्धेच्या युगात झपाट्याने प्रगती साधायची असेल तर परिसरातील सर्व गावे पक्क्या रस्त्यांनी जोडली गेली पाहिजे. हे त्यांच्या लक्षात आल्यानेच त्यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागात सर्वत्र पक्के व डांबरी रस्त्याचे जाळे निर्माण झाले . एकविसाव्या शतकाला सामोरे जायचे असेल तर प्रत्येकाला शिक्षण मिळाले पाहिजे ही प्राथमिक गरज ओळखून त्यांनी परिसरात अनेक ठिकाणी माध्यमिक शाळा सुरू केल्या . त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींना, मुलींना शिक्षणाची संधी निर्माण करून दिली.
शेतकरी हा देशाचा कणा आहे, त्याची प्रगती झाली तरच देश प्रगतीपथावर जाऊ शकतो हे ओळखून डॉ. नरेंद्र घुले पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या शेततळयांची मालिकाच तयार केली .गोदाकाठच्या शेतकऱ्यांना सदैव भेडसावणारा जायकवाडी पक्षी अभयारण्याच्या इकोसेन्सेटिव्ह झोनचा प्रश्न त्यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून आवाज उठविला. शेतकऱ्यांना बॅक वॉटरचे परवाने मिळवून दिले. बॅक वॉटर वरील वीज जोडणी कोणत्याही कारणाने बंद केली जाऊ नये म्हणून सतत लढा दिला.
ताजनापुर उपसा जलसिंचन योजना टप्या -२ , नेवासा येथील मधमेश्वर बंधारा,भंडारदरा धरणाचे तीन टक्के पाणी मिळवण्यासाठी व मुळा धरणाचे पाणी टेलच्या शेतकऱ्यांना मिळण्यासाठी ,शेतकऱ्यांना सदैव भेडसवणारा विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी भानसहिवरा व खानापूर येथे 33 के.व्ही. चे वीज उपकेंद्र तर सौंदळा येथे 220 के.व्ही. चे उपकेंद्र त्यांच्या प्रयत्नांतून कार्यान्वीत झाले आहे. वीजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी त्यांनी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यामार्फत 31.5 मेगावॅट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित केला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघावा यासाठी भेंडा,कुकाणा व इतर गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण केली. नेवासा येथील न्यायालय इमारत,आय.टी.आय व ट्रेनिंग स्कूल इमारत,नेवासा-शेवगाव येथे क्रीडा संकुल, शेवगाव येथील बसस्थानक,दूध संघ निर्मिती, शेवगाव येथे पोलीस उपअधीक्षक कार्यालय, दक्षिण नगर जिल्ह्यासाठी दहिगावने कृषी विज्ञान केंद्र.
भगूर के.टी.वेअर,भगूर पूल, मुळा उजवा कालवा नूतनीकरण, ज्ञानेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र विकास, भातकुडगाव, शिरसगाव,नेवासा येथील आरोग्य केंद्रे,सामानगाव बंधारा,स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र, ज्ञानेश्वर कृषी फार्म,ज्ञानेश्वर साखर कारखाना विस्तारीकरण इत्यादी लक्षणीय ठरतील अशी कामे केली.
डॉ. नरेंद्र घुले पाटील हे केंद्रीय कृषी मंत्री नामदार शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत. महाराष्ट्राचे भुमीपुत्रला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे त्यांचे विकासकार्य, संघटन कौशल्य व कामाचा आवाका पाहून राज्यपातळीवरील अनेक जबाबदाऱ्या वेळोवेळी पक्षाने त्यांच्यावर टाकल्या आहेत. महाराष्ट्र विधानमंडळ व्यवस्था, आश्वासन, महसूल ,सहकार व वस्त्रोद्योग,लोकलेखा आदी समित्यावर काम करण्याची त्यांना संधी मिळाली या माध्यमातून त्यांनी राज्यातील अनेक प्रश्न विधिमंडळात मांडून त्यावर चर्चा घडवून आणली आहे.
पुरोगामी विचारसरणी, सच्चा समाजसेवक, प्रामाणिकपणा, सुसंस्कृतपणा, शासन पातळीवर काम करून घेण्याची प्रचंड क्षमता , स्वच्छ व कार्यक्षम प्रतिमा , सेवाभावीवृत्ती , कामाची तत्परता , सामान्य लोकांशी थेट संवाद या गुणांमुळे ते आपले वेगळेपण टिकून आहेत . तरुण, शेतकरी, महिला, ऊसतोडणी कामगार , कष्टकरी या सर्वांना प्रगतीची दिशा देणारे डॉ. नरेंद्र घुले पाटील यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभावे याच परीसरातील जनतेच्या वतीने शुभेच्छा....
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड / अशोक वाघ ,शेवगाव.