आज संपूर्ण जग कोरोना नावाच्या जागतिक महामारीने आपल्या विळख्यात घेतले आहे. कोरोना विषाणू म्हणजे काय आहे,त्याची लक्षणे,त्याचा प्रसार कश्याप्रकरे होतो, प्रसार होऊ नये म्हणुन आपण काय काळजी घ्यायला हवी याबाबत आपण सर्वानीच जागरूक राहायला हवे.
कोरोनाव्हायरसचा अधिक प्रसार होऊ नये, यासाठी शाळा, कॉलेज, अशी गर्दीची ठिकाणं बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला.तसेच डॉक्टर्स, नर्स, पोलीस, बँकांमधील अधिकारी आणि कर्मचारी, मेडिकल्स, पत्रकार, शेतकरी व इतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्ती स्वतःचे जीव धोक्यात घालून नागरिकांना कोरोनापासून वाचविण्यासाठी दिवस रात्र सेवा करताना दिसत आहेत. करोना विषाणू हे एक जागतिक संकट आहे.आणि संकट आपल्याला अनेक गोष्टी शिकवत असतात. संकटाचे परिणाम हे जसे नकारात्मक असतात तसेच सकारात्मक ही असतात.कारण संकटाच्या काळात आपली बलस्थाने आणि कमजोरी यांची आपल्याला जाणीव होत असते.
करोना विषाणू च्या प्रसार होत असल्याने सरकारने लॉकडाउन चा निर्णय घेतला. यामुळे करोना चा प्रसार होण्यावर नियंत्रण आलेले आहे.परंतु त्याचे अनेक परिणाम समाजावर झालेले दिसतायेत.जीवनावश्यक वस्तू सहजपणे उपलब्ध होण्यावर बंदी आलीय, सर्वसामान्य जनतेला आणि मुख्य म्हणजे गरीब स्तरातील जनतेला रोजगार न मिळाल्या मुळे त्यांच्यासमोर हालाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे.अनेक महत्वाची काम ठप्प झालेली आहेत.समस्त लग्नाळू वर्गातील युवा युवतींचे लग्न समारंभ पुढे ढकलल्या गेल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पासरलीय.शालेय विद्यार्थ्यांच्या तसेच पदवी स्तरातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन ढासळले आहे.या सर्व गोष्टींचे विपरित परिणाम येत्या काही दिवसात दिसून येतील.
या महामारी मुळे द्राक्षे,डाळिंब,भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या वर्षी निसर्गाने तारले पण कोरोनाने मारले असे शेतकऱ्यांचे झाले.
ही झाली नकारात्मक बाजू. परंतु या संकटाची सकारात्मक बाजूही आहे. जसे की लॉकडाउन मूळे सर्व जनता घरात बसून असल्यामुळे पर्यावरणीय दृष्ट्या त्याचा विचार केला तर सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी होत नसल्याने होणारे ध्वनि प्रदूषण, वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण, तसेच शहरी भागातील मोठया नद्या मध्ये होणारे जलप्रदूषणा वर मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.उदाहरण म्हणून घ्यायचं झाले तर दिल्ली मधील मोठया उद्योग आणि व्यावसायामुळे अस्वच्छ झालेली यमुना नदी आता पूर्णपणे साफ दिसत आहे,कधी काळी यमुना नदीचे पाणी निळे होते हे सांगितले जायचे पण ते बघायला कधी मिळाले नाही,ते आता या करोना मुळे बघायला मिळाले.थोडक्यात काय सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता याविषयीची जाणीव लोकांना झाली आहे. या कोरोना मुळे जर कोणाला सुख लाभले असेल तर त्या म्हाताऱ्या आई वडिलांना ज्यांची शहरात राहून दुरावलेली मुले,नातवंडे या विषाणू ने जवळ आणली.
आयुष्यात नेहमी घाई करणारा माणूस आज मात्र शांत आहे जो चुकला त्याला कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त आहे.
लॉकडाउन मुळे सर्वाना घरातच बसून राहावे लागत असल्याने आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी सर्वांना मिळाली आहे.सोशल डीस्टनसिंग वाढवत असताना आपण फॅमिली डीस्टनस कमी करण्यावर भर देऊ.या मिळालेल्या मोकळ्या वेळेचा सर्वांनी फायदा घ्यायला हवा.आपल्या घरातच बसून भरपूर वाचन आपल्या मेंदूसाठी आणि, व्यायाम, प्राणायम, योग्य आहार आरोग्यासाठी करणे गरजेचे आहे.ज्यामुळे आपली मानसिक आणि शारीरिक प्रतिकारशक्ती निश्चितपणे वाढू शकते आणि आपण करोना विषाणू वर मात करू शकतो.
एक लक्षात ठेवा,
निसर्ग तुमच्या गरजा भागवतो चैन नाही....
त्यामुळे या छोट्या जीवाकडून(कोरोना विषाणू)एकाच शिकवण घ्या,
आता फक्त गरजा भागविण्यावर भर द्या चैन नाही.
घरी राहा,सुरक्षित रहा
-सीमा अरुण आरगडे
योग प्रशिक्षक
सौंदाळा नेवासा अहमदनगर