अहमदनगर शेवगाव  : 
शेवगाव तालुक्यातील रांजणी येथील कु. स्नेहल काकासाहेब घुले ही आयबीपीएस परिक्षा उत्तीर्ण झाली असून तिची बॅक ऑफ इंडियाच्या अॅग्रीक्लचर फिल्ड ऑफिसर पदावर निवड झाली आहे. अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन व घुले शिक्षण संस्थेचे  प्रा. काकासाहेब घुले यांच्या  कन्या असलेल्या स्नेहलने आपले  माध्यमिक शिक्षण  शेवगाव येथे पुर्ण करुन बारामती येथे कृषी पदवीचे शिक्षण पूर्ण करत  बँकेच्या आयबीपीएस परिक्षेत  ऊर्तीर्ण होऊन फिल्ड ऑफिसर पदापर्यंत यशस्वी मजल मारली. या यशाबद्ल माजी आमदार नरेंद्र पाटील व चंद्रशेखर घुले पाटील,  जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्री घुले, शेवगांव पचायंत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले, माध्यमिक शिक्षक सोसायटी चे आधारस्तंभ प्रा. भाऊसाहेब कचरे, शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिल मडके,  दहिगाव- ने सरपंच सुभाष पवार,  प्रा. कारभारी नजन, प्राचार्य डॉ. डि .एन .वाबळे,   प्रा.आण्णासाहेब काटे,  प्रा. त्र्यंबक जाधव,  देवटाकळी जिजामाता विद्यालय मुख्याध्यापक कल्याणराव मडके, मठाचीवाडी सरपंच सतिष धोंडे, आदींनी अभिनंदन केले आहे. 

माय  सह्याद्री टीम  शंकर मरकड/अशोक वाघ, शेवगाव.
Contact us - mysahyadrilive@gmail.com 
थोडे नवीन जरा जुने