अहमदनगर शेवगाव : 
सोमवारी पदभार स्विकारण्याची शक्यता. 
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे  तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या अर्चना भाकड - पागिरे यांची अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वादग्रस्त ठरलेल्या तहसीलदार विनोद भामरे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर अर्चना भाकड यांची नियुक्ती झाली आहे. मध्यंतरी तहसीलदार विनोद भामरे यांच्या रजेच्या कालावधीत आसीमा मित्तल यांनी  तहसीलदार म्हणून काम पाहिले. तर नायब तहसीलदार मयुर बेरड,भानुदास गुंजाळ यांनी ही या काळात चांगले कामकाज हाताळले.

शेवगाव तहसीलदार म्हणून नियुक्ती होणाऱ्या अर्चना भाकड यांनी याआधी अहमदनगर जिल्ह्यातील नगर व नेवासा तालुका तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून काम पाहिलेले आहे. या दोन्ही तालुका तहसील कार्यालयातील उत्कृष्ट  कामकाज नंतर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे तहसीलदार म्हणून त्यांची  नियुक्ती करण्यात आली होती. सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने शासन आदेशानुसार शेवगाव तहसील कार्यालयात भाकड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त तहसीलदार अर्चना भाकड यांना जिल्ह्यातील प्रशासकीय कामाचा पुर्व अनुभव असला तरी तहसीलदार म्हणून त्या प्रथमच जिल्ह्यात येत आहेत.तहसील कार्यालयीन शिस्त व सर्वसामान्य नागरिकांच्या  प्रशासकीय कामाचा निपटारा त्यांच्या कार्यकाळत निश्चितच होईल.

शेवगाव तहसील कार्यालयाला प्रथमच पुर्ण वेळ महिला तहसीलदार मिळाले असल्यानचे समजते. ब-याच दिवसापासून रिक्त असलेल्या शेवगाव तहसीलदार पदाची अखेर प्रतिक्षा संपली आहे. आधीचे तहसीलदार विनोद भामरे यांच्या वादग्रस्त कारकिर्दीत मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर प्रशासनाने  प्रशिक्षणार्थी महिला आयएएस अधिकारी आसीमा  मित्तल यांची नियुक्ती काही काळासाठी केली होती.आता तर पुर्णवेळ महिला तहसीलदार शेवगाव तहसील कार्यालयाला मिळाल्या असुन कार्यालयीन कर्मचारी शिस्त आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कामाचा उरक या दोन ठिकाणी सुधारणा करण्याची अपेक्षा सर्वसामान्य नागरिक निश्चित करील .तर अवैध वाळू, दारू, मावा, आणि नव्याने उद्भवलेल्या कोरोना संकटाचा सामना हे मोठे आव्हान नवनियुक्त तहसीलदार अर्चना भाकड यांच्या समोर असेल.

माय सह्याद्री टीम 
शंकर मरकड  / अशोक वाघ, शेवगाव.
संपर्क - mysahyadrilive@gmail.com 
थोडे नवीन जरा जुने