अहमदनगर शेवगाव :
कोरोना व्हायरसचे जगात थैमान सुरू असुन आपल्या देशात ही मोठा धुडगूस घातला आहे. सरकारने खबरदारी म्हणून लॉकडाऊन सुरू केला आहे. या काळात सामाजिक डिस्टन्सिंग बरोबर वारंवार हात स्वच्छ करने व तोंडावर मास्क लावण्याचे सर्व देशवासियांना पंतप्रधान मोदी जी यांनी आवाहन केले आहे.
लॉकडाऊन चे पहिल्या व दुस-या जाहीर दिवसात नागरीकांनी चांगले सहकार्य प्रशासनाला केले मात्र आज लॉकडाऊन ला जवळपास दिड महिन्यापेक्षा जास्त कालावधीत झाला असून नागरीक आता घरात राहणे पर करत नसून येनकेन कारणाने बाहेर फेरफार मारताना दिसत आहे. चार दिवसापासून ब-याच दुकानांना उघडकीस परवानगी देण्यात आल्यानंतर तर गर्दीत तीन चार पटीने भर पडली आहे. ते ही कुठलेही खबरदारीचे उपाय न करता. या काळात तोंडाला मास्क लावणे सक्तीचे असताना ग्रामीण भागात मात्र मोठ्या प्रमाणात नागरिक या बाबतीत हलगर्जीपणा करत आहेत. एक प्रकारे ग्रामीण भागाला कोरोना खबरदारीत तोंडाला मास्क लावण्याचे वावडे दिसते आहे.
माय सह्याद्री टीम शंकर मरकड / अशोक वाघ ,शेवगाव.
contact us - mysahyadrilive@gmail.com
घरात रहा सुरक्षित रहा