अहमदनगर शेवगाव :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती घरातच साजरी करा विजय नजन, धनंजय तागड .
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 295 वी जयंती रविवार ३१ मे रोजी आहे. कोरोनाच्या महामारी मुळे अहिल्यादेवींचे जन्मगाव चोंडी येथे आपण जाऊ शकत नसल्याने आपण घरातच अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करावे. आणि अहिल्या देवी होळकरांच्या विचाराचा वारसा जपावा असे आवाहन शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील धनगर समाज संघटनेचे विजय नजन आणि माळेगाव येथील धनंजय तागड यांनी समाज बांधवांना केले आहे.
माय सह्याद्री शी बोलताना त्यांनी सांगितले की चौंडी मध्ये अनेक वर्षापासून धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब डांगे , महादेव जानकर ,राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जयंतीचा कार्यक्रम लाखोंच्या उपस्थितीत साजरा होतो या वर्षी कोरोनाच्या महामारी मुळे छत्रपती शिवाजी महाराज ,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी होऊ शकली नाही. त्याचप्रमाणे अहिल्यादेवीं जयंती सार्वजनिक पध्दतीने साजरी होणार नाही हे समाज बांधवांनी लक्षात घेऊन जयंती घरातच साजरी करावी. आपण रायगडावर, महात्मा फुलेंचे जन्मगाव कडगुळ ,जिजाऊंचे जन्मगाव सिंदखेड राजा येथे गेल्यावर आपणास ऊर्जा मिळते तशीच चौंडी ला गेल्यानंतर आपल्याला येथे नवचैतन्य, ऊर्जा मिळत असते ती ऊर्जा घेऊन आपण वर्षभर समाजाप्रती काम करत असतो .यावर्षीची तशी परिस्थिती नसल्यामुळे अहिल्यादेवींच्या जयंती चा कार्यक्रम घरात बसून साजरा करावा व त्यांच्या विचारांची बांधिलकी म्हणून आपण जयंतीचा कार्यक्रम साजरा करू .अहिल्यादेवींचे समाज कार्य खूप मोठे असून त्यांच्या विचारांचा वारसा म्हणून आपण घरीच थांबून रविवारी 31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजर करूया.
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड / अशोक वाघ, शेवगाव.