अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त शेतकरी सन्मान करण्याचा निर्धार १६ मे २०२० सकाळी ९ वा. विनित मा. खा. राजू शेट्टी.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मध्ये शेतकरी " अन्नदाता योध्दा" च्या रूपात कैकपटीने नुकसान सोसून देशातील नागरिकांना अन्न पुरवले. पुढील काळासाठी देशातील अन्नधान्याच्या कोठार भरणा देखील केला. याची जाणिव ठेवून अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने सामाजिक सुरक्षितता राखून १६ मे रोजी जागतिक कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधत शेतकरी सन्मान करण्यासाठी सकाळी ९ वाजता आपल्या अंगणात, घरावर अथवा घराजवळील योग्य ठिकाणी संघटनेचा झेंडा अथवा कोणतेही कृषी औजार ५ मिनिटे हाताने उंचावून धरून शेतक-यांचा सन्मान करूया तसेच त्यांच्या या लढ्याला आपण पाठिंबा देऊया आणि अभिमानाने, सन्मानाने, गर्वाने म्हणा - मी शेतकरी आहे. असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष, मा. राजू शेट्टी यांनी केले आहे. आपण ही शेतकऱ्यांचीच मुले आहोत तेव्हा चला सन्मान करूया या अन्नदात्याचा शेतकरी राजाचा.
माय सह्याद्री टीम शंकर मरकड / अशोक वाघ शेवगाव