अहमदनगर शेवगाव :
दहिगावने नवजीवन विद्यालयाचा वर्क फ्रॉम होम अभ्यास व्हिडिओ द्वारे
कोरोना लॉकडाऊन खबरदारीत या वर्षी  शैक्षणिक परीक्षा रद्द कराव्या लागल्या असुन परीक्षा न देताच विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आले आहेत. परीक्षा कालावधी आधीच लॉकडाऊन काळात शाळा महाविद्यालयांना खबरदारी म्हणून सुट्टी दिल्याने अभ्यासक्रम अपूर्ण राहिला होता. यावर  शैक्षणिक पातळीवर निर्णय घेऊन वर्क फ्रॉम होम  ही संकल्पना विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली. व्हाट्सप  गु्प च्या माध्यमातून ती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत थेट पोहचवण्यात मदत झाली. 

त्यानुसार आज अनेक शालेय विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आपल्या शाळेशी व शिक्षकांशी जोडून राहिले आहेत.यात अनेक विद्यालयाने वेगवेगळ्या प्रकारचा कलात्मक अभ्यासक्रम दिला. अशाच एका वेगळ्या धाटणीचा प्रयोग शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील  जनता शिक्षण प्रसारक च्या नवजीवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने वरीष्ठ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे शालेय विषय शिक्षक राबवत आहेत. यामध्ये क्वचित च एखाद्या विद्यालयाने राबवला असेल असे  स्वतहा तयार केलेले व्हिडिओ क्लिप द्वारे विषय ज्ञान शिक्षक विद्यार्थ्यांना देत आहेत. ज्युनिअर व सिनियरच्या सर्व  इयत्तेतील  विद्यार्थ्यांसाठी हि संकल्पना राबविण्यात येत आहे.

संस्था अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले , सचिव चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा शालेय शिक्षक व्हिडिओ केंद्रीत अभ्यासक्रम काळाची गरज ओळखुन याची सुरुवात संस्थेच्या सर्व विद्यालयात करण्यात आली असुन सर्व शिक्षकांना संस्थेच्या वतीने ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जनता  शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी के. वाय. नजन यांनी दिली.
एक नवीन उपक्रम व लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक तयारी होत असल्याने या उपक्रमाचे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ राजश्रीताई घुले, सभापती डॉ क्षितिज घुले व पालक वर्गातून स्वागत व कौतुक केले जात आहे.

संस्थेचा उद्देश विद्यार्थी हित
लॉकडाऊन काळात वर्क फ्रॉम होम ला विद्यालयाचे वतीने   प्राधान्य देण्यात आले आहे . व्हिडिओ क्लिप द्वारे विद्यार्थ्यांना शाळेतील चार भिंतीत, फळ्यावर रेखांकित धडे शिकवले जात असून मुलांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विद्यार्थी हिताचा उद्देश लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेला व्हिडिओ क्लिप द्वारे दिला जाणा-या योजनेचा उद्देश सफल होत आहे.  तर सर तुम्ही ११ वी १२ वी तसेच पदवीच्या विद्यार्थ्यांना अकाउंटिंग हा विषय सरळ आणि सोप्या भाषेत शिकवता.प्रॉब्लेम सोडवताना वेगवेगळी उदाहरणे देऊन आमच्या मनाचा ठाव घेऊन बुध्दी पूर्वक समजावतात. 


प्रा. महेश शेजुळ , दहिगावने नवजीवन विद्यालय शिक्षक

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अकाउंटिंग विषयाची भीती दूर करण्यासाठी you tube च्या माध्यमातून ऑनलाईन स्टडी मार्फत आमचा हा विषय मुळापासन मजबूत होत आहे.तुमचा आत्मविश्वसपूर्वक सांगण्याची पद्धत,आणि आमच्या विकासाची तळमळ यामधून दिसते.
प्रॅक्टिस टू प्रॅक्टिस परफेक्ट man असे सांगून अकाउंटिंग विषय आम्हाला सोपा वाटत आहे अशी प्रतिक्रिया विद्यार्थी अक्षय माताडे याच्या बरोबर अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या व अशापद्धतीने तुमचे मार्गदर्शन मिळो ही अपेक्षा व्यक्त केली प्रा. महेश शेजुळ , दहिगावने नवजीवन विद्यालय शिक्षक

शाळेत बसून शिकत असल्यासारखे वाटते
लॉकडाऊन काळात आमच्या शाळेतील विषय शिक्षकांनी स्वतहा  प्रत्यक्ष शिकवल्याचा व्हिडिओ क्लिप दररोज गु्प वर येत असून महाविद्यालयाचे शिक्षकांनी ऑनलाइन लेक्चर घेण्यास सुरुवात केल्याने  आम्हाला प्रत्येक  विषयाचे पुर्व ज्ञान व त्रुटी  समजयाला लागल्या आणि लाॅकडाउनच्या काळातही आम्ही ऑनलाइन शिकवणीने आमच्या शाळेशी जोडले गेले असुन शाळेतील वर्ग खोलीत बसून शिकत असल्यासाऱखे वाटते . दिव्या जिरे - दहावी इयत्ता विद्यार्थीनी/ शेख मुकतार रशिद S .Y .B.COM  नवजीवन विद्यालय विद्यार्थी दहिगावने ता. शेवगाव.

व्हिडिओ लिंक YouTube 
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड / अशोक वाघ. शेवगाव.
थोडे नवीन जरा जुने