अहमदनगर :
कोरोना लॉकडाऊन काळात अहमदनगर जिल्हा
वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण (सेस) महाराष्ट्र राज्य (आरएसपी ) पोलीस प्रशासनास बंद काळात महत्वपूर्ण वाखाणण्याजोगे मदतकार्य कोरोना महामारी काळात जिवाची परवा न करता विनामोबदला काम करून प्रशासनास उत्तम सहकार्यकेल्याबद्दल अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने कौतुक करत अभिनंदन पत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला .
त्यात जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवजीवन माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक व आर .एस .पी .चे जिल्हा कार्याध्यक्ष सिकंदर शेख यांचा अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने अभिनंदन पत्र देऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला .भविष्यकालीन कामासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील सर्वच आर .एस.पी .शिक्षकांना शुभेछ्या देण्यात आल्या.याप्रसंगी जिल्हापरिषद सदस्य सौ प्रभावतीताई ढाकणे,शिक्षक सोसायटीचे चेअरमन काकासाहेब घुले , समादेशक बोंतले एस. पी. ,प्रा. संजय भुसारी आदी यावेळी उपस्थित होते.
विना मोबदला दिली ४० दिवस लॉकडाऊन सेवा
पुढील काळात एस .पी .मा.अखिलेश कुमार शिंग ,उप पोलीस अधीक्षक मा.सोनवणे मॅडम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मा.सागर पाटील , शिक्षणाधिकारी मा.थोरे ,वाहतूक नियंत्रण शाखेचे मोरे व महासमदेशक देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाने RSP अधिकारी यांनी बंदोबस्त कार्य उत्कृष्ट पध्दतीने जीवनातील महत्वाची वेळ कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता स्व खर्चाने गेली 35 ते 40 दिवस सेवा रुपात दिली. जिल्ह्यातील जिल्हा समादेशक एस पी बोंतले व जिल्हा कार्याध्यक्ष सिकंदर शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.
माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले , सभापती डॉ.क्षितिजभैय्या घुले , प्रशासकीय अधिकारी के .वाय.नजन प्राचार्य विष्णू मरकड , सेवा सोसायटी अध्यक्ष शब्बीरभाई शेख,उपाध्यक्ष बाळासाहेब मरकड, सरपंच सुभाष पवार, शिक्षक सोसायटी अध्यक्ष काकासाहेब घुले, आदींनी विशेष अभिनंदन केले आहे.
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड , अशोक वाघ