अहमदनगर शेवगाव :
आज युवकांच्या हाताला काम पाहिजे, छोट्या उद्योजकांना सरकारी आर्थिक मदतीचे पाठबळ पाहिजे, ग्रामीण भागात रोजगारांची संधी वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने ग्रामीण भागात गुंतवणूक वाढवली पाहिजे आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांना अमेरिका व इतर देशात तेथील नागरिकांना शासनाकडून बेरोजगारी भत्ता मिळतो त्या धर्तीवर लॉकडाउन काळात युवकांना केंद्र सरकारने बेरोजगार भत्ता सुरू करावा अशी मागणी शेवगाव तालुका पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात कोरोना सारखी समस्या आपल्या खंबीर नेतृत्वाखाली महाराष्ट्र या आव्हानावर यशस्वीपणे मात करेल. आणि भविष्यात आपण पुन्हा एकदा नवी भरारी घेऊ.
असा विश्वास व्यक्त करत लॉकडाउन काळात युवकांना बेरोजगार भत्ता द्यावा अशी मागणी केली आहे. आज ग्रामीण भागातील अनेक युवक पुणे मुंबई येथे नोकरी करतात, त्यांचे गावाकडील कुटुंब त्यांच्यावर अवलंबून आहे, त्यांनाच आज बेरोजागारीमुळे गावाकडे परतावे लागत आहे. आधीच ग्रामीण भागात बेरोजगारीचा प्रश्न होता त्यात कोरोनाच्या संकटाने भर टाकली आहे. पुढे मंदी चे महासंकट येणार आहे यात बेरोजगार तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होणार तो होईल तेव्हा होईल परंतु आज हाताला काम नसना-या युवकांना बेरोजगार भत्ता मिळायला पाहिजे अशी मागणी त्यांनी आहे.
मागणी सह्याद्री टीम
शंकर मरकड /अशोक वाघ शेवगाव.
Contact us - mysahyadrilive@gmail.com