अहमदनगर शेवगाव:
श्रीमती प्रतिभाताई म.जवळे , यांचे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे .नागरीकांकडून प्रशासनाला म्हणावे तसे सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
कोरोना संकट समयी खबरदारीत आज पोलीस, डॉक्टर , नर्स, यांना नागरीकांनी देव मानलय .प्रशासन नागरिकांना व इतर मदतकार्य करणा-या व्यक्तींचा हौसला, आत्मविश्वास वाढण्यासाठी त्यांना उद्देशून तसेच नागरीकांनी प्रशासनाला मदत करण्याच्या दृष्टीने एक आव्हानात्मक कविता रचलीआहे खुद्द एका पोलीस अधिकारी यांच्या आईने . अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येेेेथील उपविभागीय पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे यांच्या मातोश्री श्रीमती प्रतिभाताई म.जवळे आटपाडी जिल्हा सांगली सध्या शेवगाव येथे स्थाईक असलेल्या माईंनी सध्याच्या जवळे साहेबांच्या दैनंदिन कामकाजावरून एक अप्रतिम शब्द रचना असलेली कविता रचली आहे. ती अशी......
गो कोरोना गो.. (श्रीमती प्रतिभाताई म.जवळे )
कोरोना व्हायरस काही केले तरी संपेना ,वाढत्या संख्येमुळे पोलीस, डॉक्टर ,प्रशासनाला चैन पडेना!
माणसे करीत नाही व्यवस्थित नियमांचे पालन ,कोरोना वाढविण्यास स्वतःच बनताय कारण !
माणसांना आवरता आवरता पोलिसाचा जीव येतो घाईला ,आपण मात्र घाई करतो घरांबाहेर पडायला !
प्रत्येक जण करतो आपल्याच कुटुंबाची काळजी पोलिस, डॉक्टर ,प्रशासन करतात लोकांची काळजी!
लोकांच्या सेवेसाठी ,काळजीपोटी त्यांची बदलून जाते काया ,भारतीयांनो आता तरी आपण नियमांचे पालन करुया !
पोलीस ,डॉक्टर ,प्रशासन यांना आपण साथ देवूया ,आपण आपली काळजी घेवूया ,कोरोनाला नष्ट करूया ,आलेल्या संकटाशी लढा देवूया कोरोना मुक्त होऊया !
कोरोना व इतर रोग बरे करुन होऊया छान !
पोलिस- डाॅक्टर - प्रशासन यांना देवूया मान - सन्मान! गो कोरोना गो - कोरोना गो. ...........
कविता कर्तव्य बजावण्यासाठी प्रेरणादायी - जवळे.
काल १० मे रोजी मातृदिनानिमित्त आपण आईला वंदुन तिचे उपकार जाणायला पाहिजे, परंतु कोरोना खबरदारीत घरच्या सदस्यांना वेळ देता येत नाही. सध्या धावपळ सुरू आहे आणि या धावपळीचे कवितेच्या माध्यमातून एक आश्चर्यकारक रूपांतर माझ्या आई ने केले आहे. हि कविता कर्तव्य बजावताना निश्चितच बळ देते.
मंदार जवळे - उपविभागीय पोलिस उपअधीक्षक शेवगाव. जिल्हा - अहमदनगर .
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड / अशोक वाघ , शेवगाव.