अहमदनगर :
अहमदनगर मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालयात वर्क फ्रॉम होम अभ्यास सुरू.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लोकडाऊन काळात शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय झालेला असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे,अहमदनगर येथील मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालय मध्ये प्राचार्य डॉ.टी.एम.वराट यांच्या मार्गदर्शनानुसार केमिस्ट्री विभागाणे प्रश्न मंजुषा या ऑनलाइन सदरातून 80% टक्के प्रश्न सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज सर्टिफिकेट चे आयोजन करण्यात आले आहे. इतिहास विभागातुन जुन्या प्रश्नपत्रिकेचे संच तसेच नोट्स, व्हाट्सअप ग्रुप(एम.जी.पी. कॉलेज अ.नगर) वर देण्यात आल्या होत्या.
तसेच संगणक विभागातील विद्यार्थ्यांसाठी पुणे विद्यापीठ अभ्यासक्रमानुसार मुलांना मोबाईल व्हाट्सअप (संगणक विभाग)ग्रुप तयार करू ऑनलाइन पद्धतीने संगणक विभागातील प्रॅक्टिकल व ऑडिओ /व्हिडिओ क्लिप द्वारे अध्यापनाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.या कामी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी.एम. वराट, प्रा.ए.ए.डुचे, प्रा.एस.व्ही. मरकड,प्रा.कुतळ, प्रा.सय्यद आदींच सहकार्य शिक्षकांना लाभत आहे.
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड / अशोक वाघ शेवगाव.