अहमदनगर शेवगाव

परीक्षा ना निकाल, ना सुट्टी 
मिळाल्याचा आनंद१ मे हा शालांत परिक्षेच्या निकालाचा दिवस. पुढील वर्गातील प्रवेश निश्चित करणारा दिवस. २६ जानेवारी व १५ ऑगस्ट हे दोन ऐतिहासिक झेंडा वंदना च्या दिवशी शाळेला एक दिवसीय सुट्टी असनारे दिवस मात्र १मे चा झेंडा वंदन तब्बल दिड महिन्याची धम्माल सुट्टी देणारा दिवस मात्र महामारी कोरोना लॉकडाऊन ने सुट्टी मोठ्ठी दिली परंतु वर्षभराची मेहनत कागदावर ऊतरूच दिली नसल्याने शालेय शैक्षणिक वर्ष म्हणजे ना परीक्षा, ना १ मे रोजी च्या त्या निकालाची उत्सुकता नसल्याने महामारीच्या कोरोना लॉकडाऊन ने सारा आनंदच हिरावला. १मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून शासकीय स्तरावर तर शैक्षणिक स्तरावर पहिली ते नववी इयत्तेचा निकाल दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 

या दिवशी काहिंना पुढच्या वर्गात गेल्याची ,काहिंना प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत गेल्याची तर सगळ्यांना पुढील दिड महिना धम्माल सुट्टीच्या आनंदाने मोहित करनारा हा दिवस या वर्षी मात्र सगळे पास परंतु निरुत्साही करनारा दिवस ठरला आहे. आज तंत्रज्ञान विकसित असल्याने लॉकडाऊन काळात जवळपास सर्वच शाळांनी लर्निंग फॉर होम कल्पना सुरू केली. 

त्याला प्रतिसाद ही चांगला मिळत आहे. परंतु कुठल्याही प्रकारची उत्सुकता मात्र दिसत नसुन स्टे फॉर होम काळात मुलांना थोडाफार टाईम पास व शालेय दिवस विसरू न देण्यास कारणीभूत ठरत आहे. १ मे नंतर कदाचित त्यालाही सुट्टी दिली जाऊ शकते. एकंदरीत शैक्षणिक कालखंडातील हे दिवस काळे दिवस ठरले आहे.

असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कोरोना महामारीने सर्वांचाच आनंद हिरावला असुन कोरोना संकट टाळण्याचे काहीच चिन्ह दिसत नसुन शैक्षणिक क्षेत्रात आगामी काळात होणाऱ्या परीक्षा ही अधांतरी असुन एकूणच या वर्षी शैक्षणिक क्षेत्रात  कोणीच ढ दिसनार नसुन सारे पास मात्र गुणवत्तेच काय हा प्रश्न उपस्थित होतो.


लर्निंग फॉर होम एक शैक्षणिक समन्वय साधणारा उपक्रम - शंकर मरकड

जिल्हा परिषद तसेच माध्यमिक शाळांनी शिक्षकांच्या माध्यमातून लर्निंग फॉर होम हि अभ्यास संकल्पना सुट्टी काळात राबवत असुन एक सुस्त्य उपक्रम व मुले ,पालक ,व शिक्षक यांना शाळेबरोबर जोडुन ठेवण्यात यशस्वी संकल्पना व्हाट्सप गु्प माध्यमातून राबवली जात आहे. हि संकल्पना वर्ग शिक्षकांनी पुढील सुट्टी काळात सामान्य ज्ञान व पुढील वर्गाचा अभ्यास  माहिती गु्प  च्या माध्यमातून देत रहावी यातुन विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या मध्ये शैक्षणिक समन्वय राहिल.
शंकर मरकड - अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती भाविनिमगाव. ता. शेवगाव, जिल्हा अहमदनगर.
थोडे नवीन जरा जुने