अहमदनगर पाथर्डी : 

मतदारसंघातील कोरोना योध्यांसाठी आमदार मोनिकाताई राजळे यांचेकडून सुमारे 28 लक्ष रूपयांच्या वैद्यकिय साहित्य व संरक्षण उपकरणांचे वितरण.

कोरोना साथ रोगाचा वाढता प्रार्दुभाव पाहता मतदारसंघातील यंत्रणा सज्ज व आद्यावत राहणेसाठी शासन आदेशानुसार स्थानिक विकास निधी कार्यक्रमांतर्गत शेवगांव - पाथर्डी 
विधानसभा मतदारसंघातील शासकिय रूग्णालये, डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, तसेच पोलिस यंत्रणा, प्रशासकीय विभाग, नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी यासारख्या कोरोना साथ रोगाविरूध्द लढणाऱ्या कारोना योध्यांना वैद्यकिय साहित्य व संरक्षण उपकरणे यांचे वितरण आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले. 

शेवगांव – पाथर्डी मतदारसंघ  प्रशासकिय यंत्रणेच्या सतर्कतेमुळे व नागरिकांच्या सहकार्याने सुरक्षित आहे. ( पाथर्डी तालुक्यातील कारोना पॉझिटिव्ह रूग्णाचा अपवाद वगळता ) सर्व डॉक्टर्स, आरोग्य विभागातील परिचारिका, सर्व आरोग्य कर्मचारी तसेच प्रशासकिय यंत्रणेतील महसुल कर्मचारी, अधिकारी, पोलिस कर्मचारी, दोनही नगरपरिषदेतील कर्मचारी, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका व विविध शासकिय विभागातील कर्मचारी हे रात्रों दिवस आपल्या जीवाची पर्वा  न करता आपली सेवा बजावत आहेत, त्यांचे सेवाव्रत चालु असतांना या योध्यांच्या स्वसंरक्षणात्मक साहित्याचा तुटवडा भासत आहे.

 याचप्रमाणे रूग्णालयामध्ये खबरदारीचा उपाय म्हणुन सज्ज राहण्यासाठी व अद्यावत वैद्यकिय सुविधा देण्यासाठी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याने आमदार मोनिका राजळे यांनी शासन निर्णयानुसार आपल्या स्थानिक विकास निधीतुन वैद्यकिय साहित्य व उपकराणांची उपलब्धता  करून दिली आहे.यामध्ये उपजिल्हा रूग्णालय पाथर्डी यांचेकरिता ICU व्हेंटीलेटर, मल्टीपॅरा मॉनिटर, सक्सेशन मशिन, सेमी फाऊलर बेड, ऑक्सीजन फ्लोमेटर एक्सेसरी, ऑक्सीजन सिलींडर, डिफेरीलेटर त्याचप्रमाणे शेवगांव ग्रामीण रूग्णालयासाठी ECG मशिन व साहित्य देण्यात आले. त्याचप्रमाणे सर्व डॉक्टर्स यांचेकरिता PPE किट, N95 मास्क तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथील परिचारिका, अरोग्य सेविका, आशास्वयंसेविका, मेडीकल स्ट्राफ, पोलिस कर्मचारी, महसुल कर्मचारी व इतर शासकिय विभागातील कोरोना प्रतिबंधात्मक पथकामध्ये ऑन ड्युटी काम करणारे सर्व अधिकारी  कर्मचारी यांचेकरिता 24 हजार फेसमास्क, 2 हजार हॅन्डसॅनिटायझर, 16हजार सहाशे हॅन्डग्लोज असे रूपये 27 लाख 87 हजार किंमतीचे साहित्यांचे वाटप १२ मे पासुन सुरू करण्यात आले आहे.
प्राथमिक स्वरूपात उपजिल्हा रूग्णालय पाथर्डी व तहसिल कार्यालय पाथर्डी येथे आमदार मोनिकाताई राजळे यांचे उपस्थितीत या साहित्यांचे वाटप करण्यात आले, यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. अशोक कराळे आदींसह  इतर मान्यवर उपस्थित होते, 

मतदार संघातील आम जनतेने कोरोना खबरदारी घ्यावी - आमदार राज्य.
वैद्यकिय उपकरणे व साहित्यांचे वाटप तात्काळ मतदारसंघात करण्यात येणार आहे. मात्र ग्रामीण भागात बाहेरून नागरीकांची आवक सुरू असून गावातील आपत्ती व्यवस्थापनास या  क्वारंटाईन नागरीकांनी सहकार्य करून आपल्या गावातल्या जनतेला या महामारी पासुन दुर ठेवण्यासाठी सहकार्य करावे आणि मतदार संघातील आम जनतेने कोरोना खबरदारी घेऊन आपल्या कुटुंबातील सदस्यांना या संकटापासून दुर ठेवावे. 
आमदार मोनिकाताई राजळे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ, अहमदनगर. 

माय सह्याद्री टीम
शंकर मरकड  / अशोक वाघ,  शेवगाव
contact us - mysahyadrilive@gmail.com
थोडे नवीन जरा जुने