अहमदनगर शेवगाव :
कोपरगाव येथील एस. एस. जी. एम. महाविद्यालयाच्या महिला वसतिगृहात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरसाठी आज गरजेचे विविध साहित्य आमदार आशितोष काळे यांनी दिले. यामध्ये १८० ऑक्सिमीटर, १०० फेस शिल्ड मास्क, १००० सर्जिकल हँड ग्लोव्हज, १००० मास्क, २५ लिटर हँड सॅनिटायझर, २०० डिस्पोजेबल कॅप, १० इन्फ्रारेड थर्मामीटर आदी साहित्य देण्यात आले आहे.
यावेळी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, एस. एस. जी. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकरराव थोपटे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गांगुले, नगरसेवक मंदार पहाडे, सुनील शिलेदार आदी सोशल डिस्टन्सिंग पाळुन उपस्थित होते.
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड /अशोक वाघ ,शेवगाव.