पृथ्वीला उर्जा देणा-या सुर्याची गेल्या 9000 वर्षापासून उर्जा , चमक कमकुवत होत चालली आहे. सुर्य प्रकाश कमी होत चालला आहे , हा दावा केला आहे जर्मनी अंतरिक्ष शास्त्रज्ञाच्या मैक्स प्लैंक इंस्टीट्यूट ने अमेरिका अंतरिक्ष ऐजेंसी नासा च्या केपलर स्पेस टेलिस्कोप च्या माध्यमातून मिळालेल्या आकड्यांचा अभ्यास करुन हा खुलासा करण्यात आला आहे.
photo : Nasa
शास्त्रज्ञां च्या म्हणण्यानुसार आकाशगंगेतील त्याच्यासारख्या इतर तार्यांच्या तुलनेत सूर्य कमकुवत झाला आहे. शास्त्रज्ञ सोध घेत आहे हा प्रकाश कशामुळे कमी झाला आहे.
शास्त्रज्ञांनी सांगितले आपल्या आकाशगंगेत स्थापित सुर्य सारखे इतर ता-या च्या तुलनेत आपल्या सुर्याची चमक , उर्जा कमी होऊन फिकी पडली आहे ही मोठ्या संकटा आधीची शांतता तर नाही ना,
गेल्या 9000 हजार वर्षांत हि उर्जा चमक 5 प्रतिशत कमी झाली आहे.
मैक्स प्लैंक इंस्टीट्यूट चे शास्त्रज्ञ डॉ. एलेक्जेंडर शापिरो यांनी सांगितले आम्ही आश्चर्यात पडलो आहोत आपल्या सुर्या पेक्षा जास्त एक्टिव तारे आपल्या आकाशगंगेत आहे. कारण आम्ही सुर्यासारखे 2500 तारे ची तुलना केली आहे आणि या निकषांवर आम्ही पोहचलो आहे.
सुर्यावर रिपोर्ट तयार करणारे दुसरे शास्त्रज्ञ डॉ. टिमो रीनहोल्ड यांनी सांगितले सुर्य माघच्या काही हजार वर्षांत शांत आहे हि गणना आम्ही सूर्याच्या पृष्ठभागावर तयार झालेल्या सौर डागांमधून याची गणना करतो.
परंतु गेल्या काही वर्षांत सौर डागांची संख्याही कमी झाली आहे. यावरून त्याचा प्रकाश कमी झाला आहे.