भाविनिनगाव येथे अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी.

अहिल्यादेवी होळकर यांनी अन्याविरोधी लढुण समाजातील अनिष्ठ प्रथा बंद करून एक इतिहास रचला व नंतर त्यांनी आपल्या सत्ता काळात लोकोपयोगी केलेल्या कामांची आजही ओळख पुसली नसून अहिल्यादेवी यांचे कार्य आजच्या पिढीलाही  प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन प्रा . आण्णासाहेब काटे यांनी केले. शेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती येथील जगदंबा माता सामाजिक प्रतिष्ठाण व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. 

दरवर्षी मोठ्या उत्साहात व नागरीकांच्या उपस्थित  साजरी केली जाते. यावेळी मात्र कोरोना पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मोजक्या च नागरीकांच्या उपस्थित राजमाता होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच पांडुरंग मरकड,  सदस्य सदाशिव जाधव, जगदंबा माता प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संजय काळे, मार्गदर्शक  प्रा . आण्णासाहेब काटे, उपाध्यक्ष नंदकुमार शेळके, सचिव राजेंद्र शिंदे, अशोक थोरात, ग्रामसेवक चंद्रकांत जोशी आदी उपस्थित होते. यावेळी नव्याने उभारण्यात आलेल्या शिवस्मारक प्रांगणात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन नागरीकांच्या वतीने करण्यात आले.
थोडे नवीन जरा जुने