शेवगाव अहमदनगर :
शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी  ग्रांमपंचायतीचा अादर्श उपक्रम
संपुर्ण देश कोरोना या महारोगामुळे बंद असतांना सामान्य नागरीकांना अक्षरक्ष: उपासमारीची वेळ आली आहे.
त्यांत दिव्यांग बांधवाची तर आणखीनच बेहाल परीस्थीती. एका एका घरात दोन दिव्यांग रोज कमवायचे व रोज खायचे अशी परीस्थीती.
   
परंतु देशसेवा व या महामारीवर मात करण्याचा दृढ निश्चय देशवासीयंनी केला आहे. यासाठी शासन वेगवेगळ्या योजना जाहीर करत आहे. योजना जाहीर झाले नंतर सर्वाना आनंद होतो. परंतु योजनेच अंमलबजावणी होत नाही. योजना फक्त कागदावरच राहुन जाते.

परंतु यास अपवाद ठरली पिंगेवाडी ग्रामपंचायत दिव्यांगांचा ५ टक्के  नीधी रू १५०० वाटप करायचा परंतु गावात एकुण पंचवीस दिव्यांग असल्याने एकाला अवघे साठ रुपये वाट्याला येणार मग काय करायचे असा प्रश्न पडला असता ग्रामसेवकांनी सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष चांद शेख यांना यावर तोडगा काढण्याची विनंती केली. यावर चांद शेख यांनी सावली संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांचेशी दुरध्वनी वरून चर्चा केली व अनोखा मार्ग काढला.

गावातील २२ दिव्यांगांना रेशन देवुन ग्रांमपंचायत त्यांचे रेशनचे बील भरेल हा मार्ग ग्रांमपंचायतीच्या सर्व पदाधीका-यांना आवडला. व शुक्रवार रोजी फक्त गावातील सर्व दिव्यांगांची विनारांग व सोशल डीस्टसींग ठेवुन सर्व दिव्यांग बांधव शासनाच्या नियमानुसार अंतर ठेवून उभे होते. रास्त धान्य दुकानदार यांनी सर्वांचे सेनी टायझर्स नी हात स्वच्छ करुन रेशन वाटप करण्यात आले.

शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करणारी पिंगेवाडी आदर्श ग्रांमपंचायत ठरली.
या ग्रामपंचायत सारखा आदर्श राज्यातील सर्व ग्रामपंचायतीने घेवुन दिव्यांगांना सोई सुविधा उपलब्ध करून द्याव्यत असे मत चांद शेख यांनी मांडले.
सदर उपक्रम राबवणेसाठी पिंगेवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मा.सुनिल राठोड,सरपंच रविकाका तानवडे , उपसरपंच अबिदा शेख , माजी सरपंच अशोक तानवडे , माजी उपसरपंच विठ्ठल हजारे, ग्रामपंचायत कर्मचारी रवी नागरे, बाळू शेलार सर्व ग्रामपंचायत सदस्य, स्वस्त धान्य दुकानदार अशोक जायभाये,सुनील घुले, सौरभ आघाव, कासम भाई शेख, शरद शेलार, किशोर जायभाये सर्व ग्रामस्त यांचे विषेश सहकार्य लाभले. 

याबद्दल सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था अहमदनगर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री चांद शेख यांनी सर्वांचे आभार मानले. 

माय सह्याद्री शेवगाव अहमदनगर 
थोडे नवीन जरा जुने