महाराष्ट्र अहमदनगर
पालघर पासून सुमारे 110 किलोमीटर अंतरावर असलेल गडचिंचले या गावात 3 व्यक्तींची जमावाकडून निर्गुण पणे हत्या करण्यात आली होती यात 2 साधु व एक ड्राईव्हर चा समावेश होता याच घटनेचा निषेध करत
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी घटनेची लवकर कारवाई न झाल्यास साधूसंतांच्या संतापाने होणाऱ्या परिस्थितीची व परीणामाची कल्पना देणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
पत्रात त्यांनी म्हटले आहे की सदर जमावाने या गावांमध्ये पोलिसांन समोर लाठी, दगड अशा मिळेल त्या साधनांनी बेदम मारहाण केली त्यामुळे पंचदशनाम जुन्या आखाड्याचे संत श्री कल्पवृक्षगिरी महाराज, महंत सुशीलगिरी महाराज व वाहन चालक निलेश तेलगडे या तिघांना ही प्राणास मुकावे लागले अशी निंदनीय घटना घडली आहे.
या घटनेचा श्री क्षेत्र देवगड संस्थान, वारकरी संप्रदाय व भक्त परिवार निषेध करत आहे. संपूर्ण
देशभरामध्ये लाॅकडाऊन सुरु असुन एकट्यादुकट्यालाही घराबाहेर पडणे मुश्किल झालेले असतांना या घटनेच्या वेळी एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित असुनही पोलीस प्रशासनाची फक्त बघ्याची भुमिका शंकास्पद वाटते.
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी म्हणविल्या जाणाऱ्या राज्यात प्रशासनासमोर अशी घटना घडते ही लाजिरवाणी व चिंतेची बाब आहे. संबधित साधूंचे वय विचारात घेता केवळ काही बहाण्याचे निमित्त करून घडलेली घटना पूर्वनियोजित असावी अशी वाटते.
एवढी करुणामयी घटना घडुन ही तथाकथित संस्कृती रक्षक तसेच मानवतावादी कार्यकर्त्यांनी व तत्पर मिडियाने याची दखल न घेणे हे निंदनीय आहे. तरी या प्रकरणात लक्ष घालून संबंधितांवर कठोर कार्यवाही करावी, संबधीत पोलीस कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना तातडीने कठोर शिक्षा व्हावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.
या घटनेमुळे पंचदशनाम जुन्या आखाड्याचे सर्व नागा साधू अत्यंत संतप्त झालेले असून या घटनेची चौकशी होऊन तातडीने कार्यवाही न झाल्यास लॉकडाऊन नंतर हे नागा साधू आक्रमक होऊ शकतात व तसे झाल्यासअत्यंत वाईट परिस्थिती उदभवू शकते तरी या प्रकरणी आपण तातडीने कार्यवाही करण्याची विनंती पत्राद्वारे केेेेली आहे.