अहमदनगर: 

यंदा वेळोवेळी वातावरण मध्ये होणारे बदल व न जाणवलेला हिवाळा याचा एकत्रित परिणाम आंबा झाडांवर झाला असून गावरान आंब्याला आलेला बहार ढगाळ वातावरण व वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने गळुन गेला आहे.

थोडाफार राहिलेला बहारच्या आता कैरी झाली आहे मात्र सध्या सुरू असलेल्या उन्हाच्या कहराने मोठ्या प्रमाणात कैरी गळ झाली असून गावरान आंब्याचे  यंदा  उष्णतेचा कहराने आधी बहार आणि आता कैरी गळ होत असल्याने यंदा गावरान आंबा दुर्मिळच होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. 

अनेक आंंबा झाडे या वर्षी कमी प्रमाणात बहरलेली असुन बहरलेली झाडे वातावरणातील बदलाचे बळी पडले असुन बहार सुकून गेला आहे तर आता उष्णता वाढल्याने कैरी गळ होत असल्याने कच्या कैरी चा सडाच झाडाखाली दिसत आहे त्यामुळे यंदा आंब्याच्या रसाला महाग व्हावे लागणार असुन माल प्रमाणात उपलब्ध झाला नाही तर भाववाढ होऊन गोड आंबा ग्राहक मंडळी ला कडवट होण्याची शक्यता बळावली आहे. 


यंदा लोणच्याच्या कैरी ला महाग
या वर्षी आंबा बहार म्हणावे त्या प्रमाणात आला नसून आलेला बहार गळ ने झाड मोकळे झाले आहे. किरकोळ प्रमाणात कैरी तयार झाली आहे. मात्र उष्ण तेचे प्रमाण वाढले असल्याने कैरी गळ होत आहे. असेच होत राहिले तर  यंदा लोणच्याच्या कैरी ला महाग होणार आहे.

भाऊसाहेब चेडे - शेतकरी भाविनिमगाव. ता. शेवगाव
थोडे नवीन जरा जुने