अहमदनगर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना जिल्हा परिषद अध्यक्षा या नात्याने नम्र अवाहन करते की,
सध्या जगभरात कोरोना (कोविड19) विषाणू ने थैमान घातले असून आपल्या राज्यात मार्च च्या पहिल्या आठवड्यात या विषाणू चा शिरकाव झाल्याने देशात लॉकडाऊन सुरू आहे. जिल्ह्यातील आपले ग्रामसेवक, डॉक्टर,आरोग्यसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका सर्व जि.प.अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक,माध्यमिक शिक्षक, पोलिस बांधव व सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असल्याने या सर्वांचे मी कौतुक ,व अभिनंदन करते. त्यासाठी आपण सर्व जिल्हावासी त्याला मनापासून साथ देत आहात याचा आनंद वाटतो... परंतु
हा एप्रिल महिना आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे असे मला वाटते.
या महत्वाच्या टप्यात तुमची सर्वांची अशीच साथ गरजेची आहे .कारण बाहेर पडल्यानंतर प्रत्येक वस्तूला होणारा स्पर्श हा धोकादायक ठरू शकतो .त्यामुळे कृपया गरजेव्यतिरिक्त घराबाहेर पडणे टाळा, आता आहेत तसेच घरात (वर्क फ्रॉम होम) राहा, आपले घर सोडू नका. अत्यावश्यक सेवेसाठी घरातील एकाच व्यक्तीने जाणे अपेक्षित आहे. "मी माझा रक्षक" असे केले तर कोरोना विषाणू चा संसर्ग रोखण्यासाठी आपण यशस्वी होऊ असा मला विश्वास आहे.
नामदार.सौ.राजश्री चंद्रशेखर घुले पा.
अध्यक्षा जि.प.अहमदनगर महाराष्ट्र