\अहमदनगर शेवगाव :
जिल्ह्यातील २७ दिव्यांग महीलांना मिळाला न्याय
शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ क्षितिज घुले यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील सत्तावीस दिव्यांग महिलांनी स्वयंरोजगारासाठी केलेले प्रस्ताव वगळल्याने होते मात्र शेवगाव दिव्यांग तालुका उपाध्यक्ष चाॅंद शेख यांनी सभापती यांना दिव्यांग महिलांना डावलले असल्याचे निदर्शनास आणून दिले यावर सभापती डॉ क्षितिज घुले यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले व अहमदनगर जिल्हा परिषद संबधित अधिकारी यांच्याशी पाठपुरावा करून संबंधित दिव्यांग महिलांचे प्रस्ताव मंजूर करून देत न्याय मिळवून देेत यशस्वी मध्यस्थी केली. सविस्तर वृत्त असे की जिल्हा परीषद महीला व बालकल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग महीलांना स्वयंरोजगारासाठी मिरची कांडप मशीन देण्याची योजना आली होती. सदर योजनेचा लाभ मिळणेकामी जिल्ह्यातील अनेक दिव्यांग महीलांनी आपले प्रस्ताव दाखल केले होते.
या प्रस्तावाची छाननी होवुन मागील आठवड्यात जिल्हा परीषदेकडुन लाभार्थी यादी प्रसीध्द करण्यात आली. यादीतून जिल्ह्यातील अनेक गरजु दिव्यांग महीलांचे नावे वगळण्यात आल्याची बाब सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या निदर्शनास आली त्या नंतर ताबडतोब पत्र देवुन सदर योजनेला तात्पुरती स्थगीती मिळावी अशी मागणी केली.याबाबत सभापती डॉ क्षितिज घुले पाटील यांनी देखील जिल्हा परिषदेला तशी विनंती केली.
या नंतर जिल्हा परीषदेला जाग आली व जिल्ह्यातील ज्या दिव्यांग महीलांचे नावे वगळण्यात आली होती त्या सत्तावीस महीलांचे प्रस्ताव मंजुर करण्यात आले.
याबद्दल सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या वतीने
सहकार्याबद्दल आभारी - चाॅंद शेख.
जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती राजश्रीताई घुले , शेवगाव पंचायत समीतीचे सभापती डॉ.क्षितीज घुले,सावली संस्थेचे बाबासाहेब महापुरे,गटविकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव महेश डोके ,समाज कल्याण विभाग अधिकारी रामकृष्ण बर्डे ,पद्माकर गटकळ ,संगणक परिचालक संघटना शेवगाव तालुका अध्यक्ष संतोष पावसे,सचिन घोरतळे यांचे अनमोल सहकार्य लाभले अशी माहीती सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे उपाध्यक्ष चांद शेख यांनी देत आभार व्यक्त केले.
माय सह्याद्री - शंकर मरकड, अशोक वाघ.