अहमदनगर शेवगाव :-
शेवगाव तालुक्यातील ढोरसडे शेत शिवारात नवजात अर्भक सापडले असून काही तासाचे हे अर्भक जिवंत ऊसाच्या सरीत टाकलेले आढळून आले. अतिशय घृणास्पद हा प्रकार घडल्याने परीसरात  खळबळ उडाली असून  सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.  सकाळी ११ वाजता  कांदा काढणीसाठी आलेल्या रोजगार महिलांना लहान बालकाचा रडण्याचा आवाज शेजारच्या शेतात ऐकू आल्याने तिकडे जाऊन पाहिले तर एक लहान मुल ऊसाच्या सरीत पडलेले आढळून आले. 

महिलांनी त्याची कल्पना शेतमालक व सरकारी डाॅक्टर व पोलीस प्रशासनास घटनेची माहिती देण्यात आली. ढोरसडे येथील गणेश खंबरे यांच्या ऊसाच्या शेतात हे अर्भक सापडले.  जायकवाडी धरण परीसरातील कमी लोकवस्ती असलेल्या भागात हि अशोभनीय घटना घडली आहे.  घटनेची माहिती मिळताच दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ कैलास कानडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सहकारी डॉक्टर व नर्स यांच्या मदतीने या नवजात अर्भकाचा नाळ बांधून या स्त्री  (  मुलगी  ) जातीच्या अर्भकास स्वच्छ केले. 

( हे नवजात अर्भक जन्मताच हातानेच माती सारून अर्धवट पुरलेल्या अवस्थेत होते.)  उपसरपंच ज्ञानदेव निमसे,दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे यांच्या मदतीने शेवगाव पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी स्वतहा  उपस्थित राहून बिट कर्मचारी यांच्या साहाय्याने पंचनामा केला असून सापडलेले अर्भक दहिगावने आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ कैलास कानडे यांनी  शेवगाव ग्रामीण रूग्णालयाच्या  ताब्यात दिले  आहे. तर शेवगाव  पोलीस पुढील तपास करत आहेत.
थोडे नवीन जरा जुने