उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. डोंगर परीसरात तर आता वन्य जीव घोटभर पाण्यासाठी वणवण भटकत आहे. पाण्या अभावी काही प्राणी आपला जिव गमावत आहेत. 

मुक्या प्राण्यांची अशा प्रकारे हानी होणे दुर्दैवाची बाब ठरू नये यासाठी पाण्याच्या एका घोटासाठी  तडफडणाऱ्या जीवांसाठी वनखात्याने व स्थानिक नागरीकांनी आपल्या घराजवळ शक्य असेल तीथे वन्यप्राण्यांच्या सोयीसाठी आपण पाणवठे उभारूयात .आपले थोडेसे प्रयत्न हजारो वन्य जीव वाचवण्यासाठी मदतगार ठरू शकतात.

 मढी डोंगर परीसरात , वृद्धेश्वर डोंगरात आणि आनंदवन जंगलात पानवठे भरण्याची नितांत गरज आहे. 

यासाठी सामाजिक संस्था, दानशुर व्यक्ति, देवस्थान यांनी ही चळवळ म्हणून हाती घेऊन एक सामाजिक जाणिवेतून दर वर्षी पुढे येतात. आनंदवन येथे लोकसहभागातून पाणवठे भरले जात आसत परंतु या वर्षी कोरोना प्रकरण आड आले असून काही ठिकाणी पाणवठे भरल्याचे समजते तर इतर डोंगर परीसरात पाणवठे भरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. टिम सह्याद्री ने बातमी रूपी प्रकाश टाकलाय कारण या परीसरात पाण्याची प्रतीक्षा वन्यजीवांना आणि पाणवठ्यालाही आहे.


वन्यप्राण्यासाठी तारणहार व्हा - शरद मरकड
आज कोरोना रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तर उद्भवलेल्या परीस्थितीला हरेक नागरिक तोंड देत आहे. गोरगरीब निराधार जनतेला खाण्यापिण्याची व्यवस्था काही ठिकाणी शासन, काही ठिकाणी सामाजिक संस्था, पोलीस प्रशासन, गाव पंचायत करत आहे. दानशूर व्यक्ति ही या परिस्थितीत मागे नसून मोठ्या प्रमाणात मदतीचा हातभार लावत आहेत. असाच पुढाकार स्थानिक नागरीकांनी घेऊन रानावनात, जंगल, डोंगर परीसरात सामाजिक दाईत्व म्हणून वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी यासाठी स्वतहा अथवा आर्थिक मदत देऊन सहभाग घेऊन वन्यप्राण्यासाठी तारणहार व्हा . शरद मरकड - तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना पाथर्डी.


जैवविविधता टिकवा - सुनिल वजन
कोरोना आजाराने मानवाची प्रगती ची दिशा आणि दशाही बदलुन टाकली आहे. या परिस्थितीला आपला हव्यासच सर्वांत मोठा कारणीभुत आहे. आपण संपत्तीच्या नादी लागुन, आपल भविष्यच संपवुन टाकल आहे.पृथ्वीवरील ५० % जैवविविधता आज संपली आहे. खुप झपाट्याने आपला शेवटाकडे प्रवास सुरु आहे, परंतु याही अवस्थेत आपल्या सर्वांचेच प्रयत्न हे जैवविविधता टिकवुन ठेवण्यास मदत करू शकते. पत्रकार सुनिल नजन - कासारपिंपळगाव ता. पाथर्डी.

आनंदवन जंगलात लोकसहभागातुन पाणवठे
डॉ. गाडे
जैवविविधता टिकवुन ठेवण्यास मदत करणा-या वन्यप्राण्यांच्या सोयीसाठी आपण पाणवठे उभारूयात .आपले थोडेसे प्रयत्न हजारो जीव वाचवण्यासाठी मदत करणार आहेत. वृद्धेश्वर डोंगरात आणि आनंदवन जंगलात लोकसहभागातुन दरवर्षी पाणवठे भरले जातात, ह्या वर्षीही ही चळवळ सुरु झाली आहे. निसर्ग वाचवा ,तो आपल्याला वाचवेल. 
डॉ. पांडुरंग गाडे - तिसगाव.

माय सह्याद्री टीम - शंकर मरकड, अशोक वाघ शेवगाव.
थोडे नवीन जरा जुने