पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून मंजूर बंधाऱ्याचे काम होण्याकरता केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा कोपरगांव चे आमदार आशुतोष काळे यांनी घेतला.
येणाऱ्या पावसाळ्यात पाणी अडवता येईल यादृष्टीने उपाययोजना करण्यात याव्या तसेच बंधाऱ्याच्या शाश्वत कामासाठी प्रशासकीय स्तरावर लवकरात लवकर काम पुर्ण व्हावे अशा सूचना यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
लॉकडाऊनच्या काळातही कोपरगाव मतदारसंघाचा कोरोनापासून बचाव करत असताना आमदार आशुतोष काळे यांचा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा सुरूच आहे.
यावेळी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ. संगिता जगताप, कार्यकारी अभियंता श्री. पाटील, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक तिरसे, सचिन चांदगुडे, विठ्ठल जामदार, संदीप जाधव, शाखा अभियंता श्री. राऊत, शाखा अभियंता श्री. तेलंगे आदी उपस्थित होते.
शंकर मरकड सह अशोक वाघ – शेवगाव