पुरोगामी विचाराने जगत असलेल्या महाराष्ट्रात साधूची अमानुषपणे हत्या झाल्याने अखाडा महंत व वारकरी संप्रदाय यांच्या वर मोठा आघात झाला असून हत्या-यांना लवकरात लवकर कठीण शिक्षा करावी या घटनेकडे हिंदू साधु अथवा जात धर्म न पाहता सक्त कारवाई व्हावी जेणेकरून अशा प्रकारचे दृष्यकृत्य पुन्हा कोनी करणार नाही. असे मत देवगड संस्थानचे महंत भास्करगीरीजी महाराज यांनी व्यक्त केले. पालघर साधु हत्या घटनेवर ते बोलत होते.
सविस्तर माहिती अशी की पालघर जिल्ह्यातील गडचिचंले या गावात 16 एप्रिल रोजी जमावाने दगडफेक करत लाठी काठी च्या साहाय्याने दोन साधु व एक ड्राईव्हर ची निर्णघुन हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिस प्रशासनाने 110 पेक्षा जास्त लोकांना अटक केली असुन न्यायालयाने त्यांना 30 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी त्यांना सुनावली आहे.
दोषींवर कारवाई करण्यात येईल असे अश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
मात्र पुरोगामी विचाराने जगत असलेल्या महाराष्ट्रात साधूची अमानुषपणे हत्या झाल्याने अखाडा महंत व वारकरी संप्रदाय यांच्या वर मोठा आघात झाला आहे.